रेशन कार्डच्या नियमांमध्ये आताच झाला हा मोठा बदल! फक्त 450 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलेंडर पण करावं लागेल हे काम..? Ration Card Rule

Ration Card Rule नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना, ज्याद्वारे कमी किंमतीत जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेत गहू, तांदूळ, तेल, आणि रॉकेल यांचा समावेश आहे. विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे, ज्यामुळे गरजू नागरिकांना अत्यावश्यक वस्तू सुलभ दरात मिळू शकतात.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये रेशन कार्डांच्या दरांबाबतचे नियम राज्य सरकार ठरवतात. नुकतेच राजस्थान राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. आता रेशन कार्डधारकांना केवळ ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळण्याची सुविधा दिली जाईल. हा निर्णय राजस्थानमधील नागरिकांसाठी लाभदायी ठरणार आहे.

हे पण वाचा :- आता या महिलांना ही 500 रुपयांत गॅस सिलेंडर तर वीज सुद्दा मोफत पण कसा घ्याल लाभ..?

Ration Card Rule 2024

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएफएसए) पूर्वी रेशन कार्डधारकांना गॅस सिलेंडर कमी दरात मिळायचे. राजस्थान सरकारने आता फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी ही सवलत फक्त उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दिली जात होती, परंतु आता सर्व रेशन कार्डधारकांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करणे आवश्यक आहे.

राजस्थानमधील अंदाजे १.०७ कोटी नागरिक एनएफएसएच्या यादीत आहेत, ज्यापैकी ३७ लाख कुटुंबांना बीपीएल आणि उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ मिळतो. आता या निर्णयामुळे उर्वरित ६८ लाख कुटुंबांनाही गॅस सिलेंडर मिळण्याचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment