Crop Loan Interest राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे व्याज (Crop Loan Interest) माफ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 21 कोटी 99 लाख रुपयांची रक्कम परत मिळणार आहे.
या योजनेचा फायदा कोणाला होणार? : या योजनेचा फायदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. विशेषतः आजरा, गगनबावडा, शाहूवाडी, करवीर, चंदगड या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
📢 हे पण वाचा :- आता या महिलांना ही 500 रुपयांत गॅस सिलेंडर तर वीज सुद्दा मोफत पण कसा घ्याल लाभ..?
या योजनेमागे काय कारण आहे? : गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पीक कर्ज घेऊन शेती करणारे शेतकरी व्याजदराच्या बोझाखाली दबून गेले होते. त्यांच्या या कठीण परिस्थितीला लक्षात घेऊन सरकारने ही योजने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने काय उपाययोजना केली आहे? : सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 9 कोटी 99 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजन मधूनही 71 हजार 504 शेतकऱ्यांना 11 कोटी 99 लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत !
शेतकऱ्यांसाठी ही योजना का महत्त्वाची आहे? : शेती हा आपल्या देशाचा पाया आहे. शेतकरी आपल्या देशाचे अन्नदाते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक पाऊल पुढे आहे.