Gharkul List On Mobile 2024 : नमस्कार केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांमध्ये मुख्यतः अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाते. आज आपण सरकारच्या मंजूर घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी यादी कशी पाहावी, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृपया शेवटपर्यंत वाचा.
घरबसल्या मोबाईलवर घरकुल यादी कशी पाहावी
तुमच्या गावात मंजूर झालेल्या घरकुल योजनेत तुमचे नाव आहे की नाही, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता. या यादीमध्ये तुमचे नाव कसे शोधायचे आणि ती यादी कशी डाऊनलोड करायची, हे पुढील प्रमाणे आहे.
घरकुल योजनेची वैशिष्ट्ये
घरकुल योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत मिळते. त्यामुळे गरजू नागरिकांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधणे कठीण झाले आहे. घरकुल योजनेमुळे त्यांना या संधीचा लाभ घेता येतो.
घरकुल योजनेची निवड प्रक्रिया
घरकुल योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया ही ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ज्या कुटुंबांचे उत्पन्न कमी आहे आणि जी कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. निवड प्रक्रियेअंतर्गत त्या नागरिकांचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट केले जाते, जी ग्रामपंचायतीच्या फलकावर उपलब्ध असते.
पात्रता अटी
1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2) अर्जदार मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
3) अर्जदाराचे वास्तव्य मागील 15 वर्षांपासून महाराष्ट्रात असावे.
4) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
5) अर्जदाराकडे स्वतःची मालकीची जमीन असावी.
📢 हे पण वाचा :- सरकार देतंय ₹50000 व्यवसाय व्यवसायसाठी बिनव्याजी कर्ज इथं करा अर्ज..!
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) सातबारा उतारा
2) ग्रामपंचायतीचा उतारा
3) मालमत्ता प्रमाणपत्र
4) जातीचा दाखला
5) रेशन कार्ड
6) आधार कार्ड
7) मतदान ओळखपत्र
8) लाईट बिल
9) मनरेगा जॉब कार्ड
10) बँक पासबुक
घरकुल यादीत नाव कसे पाहावे
1) दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
2)यादी पाहण्याचे वर्ष निवडा.
3) राज्य, जिल्हा, आणि गाव निवडा.
4) माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
5) तुमच्या गावातील घरकुल यादी स्क्रीनवर दिसेल.
ही प्रक्रिया करून तुम्ही घरबसल्या तुमचे नाव यादीत आहे का, ते तपासू शकता.