Gold Silver Price Today : सोन्या चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून जवळपास सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 11 हजार रुपयांची घसरण सुरू आहे. सोन्या चांदीचे दर आणखी खाली घसरतील याची प्रतीक्षा आहे.
ऐन लग्न सराईत सोन्या चांदीचे दर गडगडले आहेत. मात्र तरीही देखील ग्राहकांना आणखी दर खाली येतील अशी आशा असल्याने खरेदी करण्यासाठी वेट अॅण्ड वॉच च्या भूमिकेत आहेत.
16 नोव्हेंबर रोजी रिटेल मार्केटमध्ये 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर हे 75 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर RTGS पकडून 73 हजार 800 रुपये आहेत. GST सह हे दर 76075 रुपयांवर पोहोचले आहेत.
Gold Silver Price Today 2024
999 शुद्धतेचे म्हणजेच 24 कॅरेटचे दर 76 हजार 200 रुपये आहेत. तर RTGS पकडून 74 हजार 137 रुपये आहेत. GST सह हे दर 76 हजार 300 रुपये पोहोचले आहेत.
📢 हे पण वाचा :- …तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय लगेच पहा अन्यथा…?
चांदीचे दर 90 हजारांच्या खाली आले आहेत. चांदीचे दर 1 लाख 2 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. आता जवळपास 11 ते 12 हजार रुपयांनी चांदी घसरली आहे. येत्या काळात दर आणखी घसरतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
रुपयाचे मूल्य जवळपास ११८ पैशांनी कमी झालं तर डॉलरचं मूल्य दिवसागणिक वाढत असल्याने हे बदल होते आहेत. US फेडने व्याजदरात कपात केली आहे. व्हर्च्युअल करन्सी देखील नफ्यात आहे. याचे परिणाम शेअर मार्केट आणि सोन्यावर दिसून येत आहेत.
इथे दिलेले हे दर हे शुद्ध सोन्याचे दर आहेत. GST आणि मेकिंग चार्जेससह सराफ दुकानात हे दर आणखी वाढतात. शिवाय तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कॉईन किंवा ETF मध्ये पैसे गुंतवू शकतात. दागिन्यांसाठी तुम्हाला 22 आणि 18 कॅरेटमध्ये करावे लागणार आहेत.
Source : News18lokamat