Randukkar Shetat in Marathi : नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती अशी जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक शेतकरी बांधवांना उपयोगी ठरणार आहे. आजच्या या लेखात रान डुक्कर शेतात येऊ नये, आणि शेत पिकांची नुकसान करू नये, यासाठी शेतकरी बांधव विविध प्रकारचे पर्याय अवलंबत असतात. आणि असाच एक पर्याय आज आपण या लेखात पाहणार आहोत.
जो शेतकऱ्यांना नक्कीच फायदा देणारा असणार आहे. रानडुक्कर हे आपल्या शेतात येणार नाही, यासाठी आपल्याला कोणकोणते कामे करावे लागणार, म्हणजे कोणते जुगाड करावे लागेल, ही संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा.
Randukkar Shetat in Marathi
रंगीत साड्या पिकांभोवती बांधणे :- ही पध्दत अत्यंत सोपी असून सर्वसामान्य शेतकऱ्यासही शक्य होणारी आहे. शिवाय ही शक्कल एका शेतकऱ्याचीच असून आता भुईमूंग, मका या पीकाभोवती रंगबेरंगी साड्या बांधल्या जात असल्याचे आपल्या निदर्शलास येते.
यामध्ये रानडुकरांच्या वर्तवणूक पार्श्वभूमीचा वापर केला गेला आहे. या पद्धतीत विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करण्यास भीतात.
या पद्धतीचा जिथे मानवाची रेलचेल किंवा येणे-जाणे जास्त आहे, अशा भागात जास्त वापर होतो. यामुळे रानडुकरांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण 40 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी करता येते.
असाही करता येतो रानडूकरांचा बंदोबस्त
रानडुकरांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही ज्ञानेंद्रीय ही कमकुवत असतात. याच ज्ञानेंद्रीयाच्या मदतीनेच ते आपले निवारा व अन्नाचा शोध घेत असतो. स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो.
ही पद्धत अत्यंत कमी खर्चाची आहे. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. मारठवाड्यात अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत. ही पध्दत जरा निराळी असली तरी तेवढीच फायदेशीर आहे. शिवाय याकरिता खर्चही कमी आहे.
📢 हे पण वाचा :- आता दर दिवशी एवढी रक्कम गुंतवल्यास मिळणार थेट 14 लाख रुपये पहा ही नवी योजना काय..?
गौऱ्याचा धूर करणे
स्थानिक डुकरांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गौऱ्या मातीच्या भांड्यात जाळून व त्याचा धूर करून सुद्धा आपण रानडुकरांना पळवू शकतो. या पद्धतीत धूर हळूहळू पसरून रानडुकरांना पळविले जाते. या पद्धतीचा वापर मुख्यतः सायंकाळी केला जातो.
या पद्धतीत धुराचा वास येताच शेतात प्रवेश केलेल्या रानडुकरांना अगोदरच उपस्थित असलेल्या डुकरांचा आंदाज येतो. त्यामुळे एकत्र न येता रानडूकर हे पळ काढतात. म्हणजेच आपल्या आगोदरच या शेतामध्ये कोणीतरी आहे हे भासवून देण्याची ही पध्दत असून पीक संरक्षणासाठी महत्वाची आहे.
आवाजातून रानडूकरांना भीती
रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी बांधव विविध पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. जसे की, फटाक्यांचा वापर, स्थानिक ड्रम, रिकामे कॅन पत्राचे भांडे, जाळ करणे आणि जोरजोरात ओरडणे या पद्धतींचा वापर करतात.
आता वेगवेळ्या आवाजाचे किंवा गाण्यांचे यंत्रही बाजारात उपलब्ध झालेले आहेत. त्याचा वापर करूनही रानडूकरांना विचलीत केले जाते. शिवाय हे रात्री सुरु करुन ठेवले की पहाटेपर्यंत सुरुच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे कष्ट करावे लागणार नाहीत.
📢 हे पण वाचा :- …तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय लगेच पहा अन्यथा…?
श्वानांचा वापर
काही वेळेस शेतकरी पिकांचे वन्य प्राणी आणि रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्रे पाळतात. ज्यांच्या मदतीने या रानडुकरांना पळविले जाते व पिकांचे नुकसान टाळले जाते.