3 कोटी नवीन घरकुलांचा लाभ कोणाला मिळणार कोणाला नाही? येथे संपूर्ण लिस्ट चेक करा..! PM Awas Yojana

PM Awas Yojana नमस्कार आपल्याला माहीतच आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे, आणि या नव्या कार्यकाळाच्या सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरांच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून संपूर्ण देशातील गरजू कुटुंबांना घरांचे लाभ मिळणार आहेत.

या लेखात आपण पाहूया की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन लक्ष्य कसे असेल, पात्रता निकष काय आहेत, कोणत्या प्रकारच्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे, आणि कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याची सविस्तर माहिती येथे दिली आहे.

PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२१ कोटी कुटुंबांना घरांचे लाभ दिले गेले आहेत. आता योजनेच्या पुढील टप्प्यात ३ कोटी नवीन घरांच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व राज्यांमध्ये या योजनेची उद्दिष्टे जाहीर होतील, ज्यानंतर अर्ज प्रक्रियाही सुरू होईल. योजना अशा कुटुंबांसाठी आहे जे घर नसल्यामुळे अडचणीत आहेत आणि सरकारच्या निकषांनुसार पात्र ठरतात.

📢 हे पण वाचा :- आता आधार कार्डवर मिळतंय उज्वला 3.0 अंतर्गत भरलेला गॅस आणि शेगडी ते पण फ्री मध्ये कसा मिळवायचा पहाच…!

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  • गृहनिर्माण योजनेचा लाभ न मिळालेल्या कुटुंबांना – ज्या कुटुंबांना यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • स्वतःचे कायमस्वरूपी घर नसलेल्या कुटुंबांना – ज्या कुटुंबांकडे निवासासाठी स्वतःचे कायमस्वरूपी घर नाही, त्यांना ही योजना उपलब्ध होईल.
  • सरकारी नोकरी नसलेले कुटुंब – कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरीत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • करदाता नसलेल्या कुटुंबांना – जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदात्याशी संबंधित असेल, तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे – सरकारच्या निकषांनुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारक आहेत, त्यांना योजना मिळू शकते.

📢 हे पण वाचा :- आता नवीन घर घेणं आणखी स्वस्त! या बँका घरासाठी देतात सर्वात कमी व्याजदर बॅंकेची यादी जाहीर इथं पहा लिस्ट !

PM Awas Yojana अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका (रेशन कार्ड)
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा

PM Awas Yojana ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

1) प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmaymis.gov.in/
2) होम पेजवरील मेन्यू बारमधून Awaassoft पर्याय निवडा.
3) Data Entry पर्यायावर क्लिक करा.
4) राज्य व जिल्हा निवडून पुढे जा.
5) लॉगिन करून लाभार्थी नोंदणी फॉर्ममध्ये वैयक्तिक तपशील, बँक तपशील, आणि इतर आवश्यक माहिती भरा.
6) फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा.

वरील माहितीच्या आधारे, तुम्ही पंतप्रधान आवास योजनेत पात्र ठरल्यास आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करू शकता.

Leave a Comment