मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे तरी काय रे भाऊ? पहा पात्रता आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती ! Krushi Saur Pump Yojana

Krushi Saur Pump Yojana नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यायोगे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात. या योजनेच्या अर्ज प्रक्रियेपासून पात्रतेच्या निकषांपर्यंत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

योजनेची वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि स्वतंत्र सिंचन सुविधा उपलब्ध.
  • सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम भरून संपूर्ण सौर पॅनेल्स आणि कृषी पंप मिळेल.
  • अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के हिस्सेदारी.
  • उर्वरित खर्च केंद्र व राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळेल.
  • योजनेत 3 ते 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पंप दिले जातील.
  • पंपांसाठी 5 वर्षांची दुरुस्तीची हमी.

Krushi Saur Pump Yojana लाभार्थी निवडीचे निकष

  • 2.5 एकर पर्यंतच्या शेतजमीन धारकाला 3 अश्वशक्ती क्षमतेचा पंप.
  • 2.51 ते 5 एकरपर्यंतच्या शेतजमीन धारकाला 5 अश्वशक्ती क्षमतेचा पंप.
  • 5 एकराहून अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पंप.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी यांच्याजवळील शेतजमीनधारक शेतकरी पात्र राहतील.

Krushi Saur Pump Yojana आवश्यक कागदपत्रे

  1. 7/12 उतारा (जलस्रोताची नोंद आवश्यक)
  2. मालकांचा ना हरकत दाखला (₹200 च्या स्टॅम्प पेपरवर)
  3. आधारकार्ड
  4. बँक पासबुक
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. जातीचे प्रमाणपत्र
  7. पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास तसे प्रमाणपत्र

Krushi Saur Pump Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया

1) SOLAR MTSKPY या पोर्टलला भेट द्या.
2) सुविधा या बटणावर क्लिक करून अर्ज भरा.
3) अर्जात वैयक्तिक माहिती, पत्ता, जमिनीची माहिती, कृषी तपशील, बँक तपशील इ. भरा.
4) अर्ज सबमिट केल्यावर पोहोच पावती मिळेल.
5) अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास तालुका स्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी सौर ऊर्जेच्या मदतीने सिंचनासाठी अधिक सक्षम होऊ शकतात.

Leave a Comment