Cm Eknath Shinde नमस्कार राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून प्रचाराला जोर चढू लागला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख आघाड्यांचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीने कोल्हापुरात एक महत्त्वाची सभा आयोजित केली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा महत्त्वपूर्ण घोषणांची माहिती दिली आहे.
ही सभा 5 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूरमध्ये झाली, आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणावरून प्रचाराची सुरुवात केली होती.
सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील अंबाबाईचे आशीर्वाद घेत आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की आई अंबाबाईने आम्हाला नेहमीच आशीर्वाद दिला आहे, आणि 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही पुन्हा इथे येऊ.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दहा महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणे आहेत.
📢 हे पण वाचा :- रेशनकार्डधारकांनो केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड व धान्य बंद शेवटची तारीख कधी? इथं पहा
Cm Eknath Shinde 2024
1) महिलांसाठी आर्थिक मदत : राज्यातील महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत, ही रक्कम पूर्वी 1500 रुपये होती. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलिस दलात समाविष्ट केले जाणार आहे.
2) शेतकरी सन्मान योजना : शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सन्मान योजनेतून दरवर्षी 15000 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच एमपीएसवर 20 टक्के अनुदानाची घोषणाही करण्यात आली.
3) अन्न आणि निवारा : प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, आणि निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील.
4) वृद्धांसाठी पेन्शन : वृद्ध पेन्शनधारकांना दरमहा 2100 रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 1500 रुपये होती.
📢 हे पण वाचा :- आता या नागरिकांना या योजनेअंतर्गत मिळणार घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान इथं पटकन अर्ज !
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती : जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6) रोजगार निर्मिती : 25 लाख रोजगार निर्माण केले जातील. तसेच प्रशिक्षणाद्वारे दरमहा 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन दिले जाईल.
7) पाणंद रस्ते बांधणी : राज्यातील 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधण्याची योजना आहे.
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांचे वेतन : अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15000 रुपये वेतन आणि संरक्षण दिले जाईल.
9) वीज बिल कपात : वीज बिलात 30 टक्के कपात केली जाईल, आणि सौर व अक्षय उर्जेवर भर दिला जाईल.
📢 हे पण वाचा :- मोठी बातमी! आता PM किसान योजनेचे पैसे पती-पत्नी दोघांनाही मिळणार? वाचा नवा नियम !
10) व्हिजन महाराष्ट्र 2029 : सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांत व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर केला जाईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणांनी आगामी निवडणुकांसाठी राज्यात उत्सुकता निर्माण केली आहे.