BSNL New 4G Network मंडळी सध्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या 4G सेवा देशभरात वेगाने पसरविण्याचे काम करत आहे. या प्रयत्नांमध्ये, BSNL ने आतापर्यंत 37,000 हून अधिक 4G साइट्स सुरू केल्या आहेत आणि देशभरात एक लाखाहून अधिक टॉवर्स लावण्याचे काम सुरू आहे.
कंपनीने दावा केला आहे की, या आठवड्याच्या अखेरीस 63,000 अतिरिक्त 4G मोबाइल टॉवर्स लावून संपूर्ण भारतात 4G सेवा सुरू केली जाईल. यामुळे BSNL ग्राहकांना लवकरच जलद इंटरनेट सेवा मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला BSNL च्या 4G सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही जवळच्या BSNL कार्यालयातून सिम कार्ड खरेदी करू शकता. तसेच, BSNL काही शहरांमध्ये सिम कार्ड्सची होम डिलिव्हरी सेवा देखील देत आहे.
BSNL New 4G Network 2024
याव्यतिरिक्त, कंपनीने जुलै महिन्यात आंध्र प्रदेशात 2 लाखांहून अधिक नवीन कनेक्शन जोडली आहेत. रिलायन्स जिओ, एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ झाल्यामुळे, अनेक ग्राहक आता BSNL कडे वळत आहेत. BSNL सिम कार्ड वापरायला सुरू करायचे असल्यास, तुम्ही घरबसल्या सिम ऍक्टिव्हेट करू शकता.
📢 हे पण वाचा :- विहीरीसाठी आता शेतकऱ्यांना 4 लाखापर्यंत अनुदान फक्त इथं असा भरा ऑनलाईन फॉर्म मिळेल अनुदान…!
BSNL सिम ऍक्टिव्ह कसा करावा?
1) सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये BSNL सिम कार्ड टाका.
2) सिम टाकल्यानंतर, फोन रीस्टार्ट करा आणि नेटवर्क सिग्नल येण्याची प्रतीक्षा करा.
3) एकदा नेटवर्क सिग्नल दिसल्यानंतर, फोन अप उघडा.
4) आता 1507 डायल करून तुमची ओळख व्हेरिफाय करा.
5) व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे BSNL सिम सक्रिय होईल.
6) त्यानंतर तुम्हाला इंटरनेट सेटिंग्जचा एक मेसेज येईल. तो सेव्ह केल्यानंतर तुमचं 4G इंटरनेट कनेक्शन सक्रिय होईल.
📢 हे पण वाचा :- अण्णासाहेब पाटील योजनाअंतर्गत मिळतंय 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज इथं करा अर्ज…!
BSNL ने 4G फीचर फोन सादर केला
BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी कार्बन मोबाईलच्या सहकार्याने 4G फीचर फोन सादर केला आहे. हा फोन ग्रामीण भागातील BSNL ग्राहकांसाठी खास डिझाइन केला गेला आहे, ज्यामुळे त्यांना महागडे स्मार्टफोन न घेता 4G सेवा वापरण्याची सुविधा मिळेल. BSNL या उपायाने आपल्या ग्राहकांसाठी अधिक सुलभ सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.