आता टेन्शन सोडा! Pan Card हरवलं तर हरवू द्या आता नवीन Dawnload करा पॅन कार्ड ही सोप्पी पद्धत समजून घ्या Pan Card Download

Pan Card Download मंडळी पॅन कार्डचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापासून बँक खाते उघडण्यापर्यंत, व्यवसाय सुरू करण्यापासून मालमत्ता खरेदी-विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आता पॅन कार्ड अत्यावश्यक झाले आहे. पण जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल किंवा ते हरवले असेल, तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही आता पॅन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

पॅन कार्ड (Permanent Account Number) हे आयकर विभागाने जारी केलेले अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे 10-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असते. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आता अनिवार्य झाले आहे, त्यामुळे ते हरवल्यास समस्या निर्माण होऊ शकते. काळजी करू नका, कारण epan किंवा ई-पॅन कार्ड डाउनलोड करणे आता खूप सोपे झाले आहे.

Pan Card Download सुरक्षित ठेवा

आयकर विभागाने पॅन कार्ड सुरक्षित ठेवण्याचे आणि त्यासंबंधीची माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. कारण, पॅन कार्डशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

📢 हे पण वाचा :- आता अवघ्या 35 हजारात सोलर पॅनल लावा अन् वीज बिलातून सुटका!

ऑनलाइन ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे?

ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी दोन प्रमुख वेबसाइट्स आहेत.

Pan Card Download एनएसडीएल (NSDL) द्वारे ई-पॅन कार्ड डाउनलोड

  • वेबसाइट : https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
  • प्रक्रिया:
    1) वेबसाइटवर जा आणि पॅन कार्ड क्रमांक टाका.
    2) आधार क्रमांक भरा.
    3) जन्म महिना आणि वर्ष भरा, कॅप्चा टाका आणि I understand वर क्लिक करा.
    4) सबमिट केल्यानंतर, OTP येईल (ईमेल किंवा मोबाइलवर).
    5) OTP टाकून, कन्फर्मेशन बटणावर क्लिक करा.
    6) ई-पॅन कार्ड डाउनलोड शुल्क भरा (UPI, डेबिट/क्रेडिट कार्डाद्वारे).
    7) पेमेंट झाल्यानंतर ई-पॅन कार्ड डाउनलोड करा. हे पीडीएफ पासवर्ड संरक्षित असेल आणि पासवर्ड म्हणजे तुमची जन्मतारीख असेल.

📢 हे पण वाचा :- विहीरीसाठी आता शेतकऱ्यांना 4 लाखापर्यंत अनुदान फक्त इथं असा भरा ऑनलाईन फॉर्म मिळेल अनुदान…! 

यूटीआय (UTI) द्वारे ई-पॅन कार्ड डाउनलोड:

  • वेबसाइट: https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard
  • प्रक्रिया
    1) पॅन कार्ड क्रमांक टाका.
    2) जन्म महिना आणि वर्ष भरा.
    3) कॅप्चा भरा आणि सबमिट करा.
    4) OTP प्रक्रिया पूर्ण करून ई-पॅन कार्ड डाउनलोड करा.

या सोप्या पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड मिळवू शकता आणि आपल्या आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता कायम ठेवू शकता.

Leave a Comment