पत्नीच्या नावावर घर घेतल्याने काय होईल फायदा? पहा काय आहेत या फायदेशीर गोष्टी ? | Property Update 

Property Update नमस्कार मित्रांनो, घर खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे एक मोठे स्वप्न असते. या स्वप्नासाठी अनेक लोक अनेक वर्षे बचत करतात आणि योग्य वेळ आल्यावर ते घर खरेदी करतात. मात्र, घराच्या किमती व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींवरही खर्च होतो.

तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावावर घर घेतले, तर यामध्ये तुम्हाला काही विशेष फायदे मिळू शकतात. केंद्र सरकारने महिलांचा समाजातील सहभाग वाढवण्यासाठी विविध धोरणे राबवली आहेत, ज्यामुळे घर खरेदी करताना महिलांना काही सूट दिली जाते. त्यामुळे जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पत्नीच्या नावावर घर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.

Property Update गृहकर्जावर कमी व्याजदर

तुम्ही गृहकर्ज घेतल्यास, महिलांना कमी व्याजदराचा फायदा मिळतो. भारतात अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या महिला कर्जदारांसाठी विशेष योजना उपलब्ध करतात, ज्या पुरुषांच्या तुलनेत कमी व्याजदरात कर्ज देतात. त्यामुळे पत्नीच्या नावावर गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला व्याजदरात सूट मिळू शकते.

📢 हे पण वाचा :- पूर्व रेल्वे मध्ये निघाली बंपर 3115 जागांसाठी भरती पात्रता फक्त 10 वी पासइथं पहा भरा ऑनलाईन फॉर्म..!

Property Update मुद्रांक शुल्कात सूट

घर खरेदी करताना नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते, जे खूप महाग असते. पण भारतातील अनेक राज्यांमध्ये महिलांना मुद्रांक शुल्कात सूट दिली जाते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना साधारणपणे २ ते ३ टक्के कमी शुल्क भरावे लागते, ज्यामुळे तुमचा खर्च कमी होतो.

मित्रानो म्हणून जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी केली तर तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजदरात आणि मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणात फायदे मिळू शकतात. त्यामुळे घर खरेदी करताना या गोष्टींचा विचार करावा.

Leave a Comment