सरकार देतंय ₹50000 व्यवसाय व्यवसायसाठी बिनव्याजी कर्ज इथं करा अर्ज..! Pradhanmantri Svanidhi Yojana 2024

Pradhanmantri Svanidhi Yojana 2024 :- मित्रानो प्रधानमंत्री स्वनिधी योजना फेरीवाल्यांना आणि लहान व्यवसायिकांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या छोटे-मोठे व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी ही योजना मदत करते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची वैशिष्ट्ये

  • कर्ज रक्कम : या योजनेतून लाभार्थ्यांना १०,००० रुपये, २०,००० रुपये, आणि ५०,००० रुपये या तीन टप्प्यांमध्ये बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  • पहिल्या टप्प्यात १०,००० रुपयांचे कर्ज मिळते.
  • या कर्जाची वेळेत परतफेड केल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात २०,००० रुपयांचे कर्ज दिले जाते.
  • दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची परतफेड नियमित केल्यानंतर, शेवटच्या टप्प्यात ५०,००० रुपयांचे कर्ज उपलब्ध होते.
  • व्याजदर : या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही, त्यामुळे लहान व्यवसायिकांना व्यवसाय पुन्हा उभा करण्यास मदत होते.

Pradhanmantri Svanidhi Yojana 2024

कोण करू शकतो अर्ज

  • सलून व्यवसाय करणारे
  • चप्पल शिवणारे
  • पानपट्टी चालक
  • धोबी
  • भाजीपाला विक्रेते
  • फलविक्रेते
  • चहाचा ठेला चालवणारे
  • कपडे विक्रेते, पुस्तके विक्रेते, हस्तव्यवसाय उत्पादने विक्रेते इत्यादी.

आवश्यक कागदपत्रे

  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक

अर्ज प्रक्रिया

  • ऑफलाइन अर्ज : महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो.
  • ऑनलाइन अर्ज: PM SVANidhi या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज केला जाऊ शकतो. तसेच, जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) वर जाऊनही अर्ज करता येतो.

📢 हे पण वाचा :- अरे वा ! काय सांगता आता थेट शेणावर चालणारा ट्रॅक्टर तयार, शेती व मशागतीसाठी इंधन खर्च 0 रु. संपूर्ण माहिती वाचा !

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांना मदत मिळाली असून, केंद्र सरकारने यासाठी २१ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. यामुळे लहान व्यवसायिकांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळते.

Leave a Comment