Nuksan Bharpai Status नमस्कार शेतकऱ्यांना दुष्काळ, पूर, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी आपत्ती प्रतिसाद निधीतून निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत करते. 2024 मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याची नोंद शासनाने घेतली होती. त्यानंतर शासनाने निधी मंजूर करून तो जिल्हास्तरावर वितरित केला असून, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण सुरू झाले आहे.
शेतकऱ्यांना मिळणारे नुकसान भरपाई अनुदान आता थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आधार-लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम मिळते.
Nuksan Bharpai Status 2024
यासाठी महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल सुरू केले आहे, ज्यावर शेतकरी त्यांच्या अनुदानाच्या स्थितीची तपासणी करू शकतात.
या पोर्टलवर https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus VK क्रमांक टाकून शेतकरी त्यांच्या अनुदानाची स्थिती, रक्कम, बँकेची माहिती आणि ई-केवायसीची पूर्तता यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवू शकतात.
📢 हे पण वाचा :- अरे वा ! काय सांगता आता थेट शेणावर चालणारा ट्रॅक्टर तयार, शेती व मशागतीसाठी इंधन खर्च 0 रु. संपूर्ण माहिती वाचा !
सध्या नुकसान भरपाईचे वितरण सुरू असून, काही शेतकरी लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. काही शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्याने, तर काहींनी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
प्रत्येक तालुक्यात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या जात आहेत. याद्या उपलब्ध झाल्यानंतर VK क्रमांक शेतकऱ्यांना प्रदान केले जातील. शेतकऱ्यांनी आपला VK क्रमांक तलाठी कार्यालयातून मिळवावा आणि त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकेल.