पावसाळा संपला हिवाळा सुरु! या तारखेपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात पाऊस पडणार का ? पंजाब डख म्हणतात….? Havaman Andaj Punjab Dakh

Havaman Andaj Punjab Dakh नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात एक नवा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यातील पुढील काही दिवसांत राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

सध्या दिवाळी सण नुकताच संपला असून राज्यातील काही भागांत दिवाळी दरम्यान पावसाचे आगमनही पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता थंडीचे आगमन कधी होईल याची उत्सुकता आहे.

Havaman Andaj Punjab Dakh

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रात अंशता ढगाळ वातावरण राहील पावसाचे प्रमाण कमी असून हवामान मुख्यता कोरडे राहील.

📢 हे पण वाचा :- आता या नागरिकांना या योजनेअंतर्गत मिळणार घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान इथं पटकन अर्ज !

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांत अंशता ढगाळ वातावरण दिसून येईल, परंतु पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाबाबत चिंता करण्याची गरज नाही.

सध्याचे हवामान रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी, असा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे. अंशता ढगाळ वातावरणामुळे काही पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

📢 हे पण वाचा :- पीएम घरकुल घरकुल योजनेत मोठा बदल आता या नागरिकांना मिळणार हक्काचे घर पहा नवीन निर्णय ! 

पंजाबराव डख यांच्या मते, 5 नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्यास योग्य परिस्थिती निर्माण होईल, आणि 6 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळेल, तसेच फळपिकांना देखील फायदा होईल. एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा हंगाम चांगला ठरेल, असा आशावाद पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment