Gharkul Yojana मंडळी आपल्याला तर माहितीच आहे मध्यमवर्गीय कुटुंबांना सुद्धा मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्याला सर्वांनाच वाटते की स्वतःचे हक्काचे घर राहावे पण या वाढती महागाई मुलांची शिक्षण कुटुंबाची वाढलेली जबाबदारी यामुळे त्यांचे जे घराचे स्वप्न आहे पूर्ण होत नाही.
या कारणामुळे आता मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे.या वाढलेल्या महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांची सुद्धा खूप हाल होत आहेत आता या कारणामुळे मध्यमवर्गातील कुटुंबा करीता सुद्धा मोदी सरकारने मदत करण्याची घोषणा केलेली आहे. यान करिता एक जबरदस्त योजना आली आहे.
Gharkul Yojana योजनेमधून मदत
मंडळी या (PMAY-U) पंतप्रधान निवास योजना-शहरी योजनेच्या माध्यमातून जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत (EWS), जे कमी उत्पन्न गटामधील किंवा मध्यम उत्पन्न गटातील (MIG) कुटुंब आहेत यान करिता या वर्गासाठी घराचे स्वप्न साकार करण्याकरिता मदत केली जाणार. सरकारने नुकतीच PMAY-U2.0 ला मंजुरी दिलेली आहे.
या योजनेमध्ये 3 लाख रुपये ते 6 लाख रुपये दरम्यान जे कुटुंब वार्षिक वार्षिक उत्पन्न करते त्यांना एलआयसी श्रेणी ठेवले आहे तर जे 3 लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गात आहेत. आणि मंडळी वर्ग 6 ते 9 लाख रुपये उत्पन्न काढतात त्यांना एमआयजी वर्गात ठेवले आहे त्यांची जी काही वार्षिक उत्पन्न आहे त्यानुसार त्यांची श्रेणी बनवली आहे.
काय आहे ही PMAY-U योजना
मंडळी 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-शहरी चालू केली गेली. या योजनेच्या माध्यमातून 1.18 घरे मंजूर केली होती. या योजनेच्या माध्यमातून 85.5 लाखापेक्षा जास्तीची घरेही बांधली गेल. आणि बाकीची जे घरे आहे ते तयार होत आहेत. आणि मंडळी गेल्यावर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी साहेबांनी मध्यम वर्ग व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाकरिता ही घर योजना सुरू करण्याची माहिती दिली होती.