आता या नागरिकांना या योजनेअंतर्गत मिळणार घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान इथं पटकन अर्ज ! Atal Gharkul Yojana

Atal Gharkul Yojana नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे! सरकारतर्फे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

ही योजना चालू करण्यासाठी सरकारने 7 फेब्रुवारी 2019 रोजी एक जीआर (शासन निर्णय) जारी केला आहे. याच जीआरमध्ये योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, जी तुम्ही बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंकवरून पाहू शकता.

या योजनेचा लाभ कोणत्या कामगारांना मिळणार आहे? तसेच अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे.

Atal Gharkul Yojana योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक अटी

अर्जदार व्यक्तीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी.नोंदणी मुदतबाह्य (expire) झालेली नसावी. अर्जदाराच्या किंवा त्याच्या पत्नीच्या नावावर कोणतेही पक्के घर नसावे.

📢 हे पण वाचा :- मोठी बातमी! आता PM किसान योजनेचे पैसे पती-पत्नी दोघांनाही मिळणार? वाचा नवा नियम !

Atal Gharkul Yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. सक्षम प्राधिकरणाकडून दिलेले ओळखपत्र
  2. आधार कार्ड
  3. जमीन असल्यास सातबारा उतारा
  4. बँक पासबुक
  5. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  6. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा ईमेल आयडी

Atal Gharkul Yojana अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज तुम्ही घरबसल्या करू शकता, तर ऑफलाइन अर्जासाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करून, त्याची प्रिंट काढून त्यामध्ये आवश्यक माहिती भरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जमा करू शकता.

📢 हे पण वाचा :- बापरे! Jio ने वाढवलं BSNL चे टेन्शन 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात लॉन्च केले 2 रिचार्ज प्लॅन !

Atal Gharkul Yojana योजनेचा उद्देश

सरकारची ही योजना राबवण्यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे.
1) बांधकाम कामगारांना स्वतःचे घर उपलब्ध करणे.
2) गाव-खेड्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे.
3) विशेषता ग्रामीण भागात या योजनेचा प्रसार करणे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ही सर्वसामान्य बांधकाम कामगारांसाठी लाभदायी ठरणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. योग्य कागदपत्रांसह नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घ्या!

Leave a Comment