UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली या तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही ! Aadhaar Card Update

Aadhaar Card Update नमस्कार जर तुम्ही गेल्या 10 वर्षांत आधार कार्डवरील पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल, तर UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने दिलेल्या नवीन संधीचा लाभ घेऊ शकता. UIDAI च्या ताज्या माहितीनुसार, तुम्ही 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार तपशील ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.

UIDAI च्या मते गेल्या 10 वर्षांत आधार अपडेट न केलेल्यांसाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करून तपशील अपडेट करणं आवश्यक आहे. यापूर्वी ही मुदत 14 जून 2024 होती, जी वाढवून 14 सप्टेंबर 2024 करण्यात आली होती, आता ती 14 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. या तारखेनंतर अपडेटसाठी शुल्क लागू होईल.

Aadhaar Card Update अपडेट का करावे?

आधार हा आपल्या ओळखीसाठी असलेला 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित असतो. आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी जारी केलेले असेल आणि अजूनही त्यात अपडेट नसेल तर UIDAI तुमची ओळख आणि पत्ता प्रमाणित करण्यासाठी नव्या पुराव्यासह अपडेट करण्याचा सल्ला देते. यामुळे आधार तपशील अचूक आणि सुरक्षित राहतील.

📢 हे पण वाचा :- रेशनकार्डधारकांनो केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड व धान्य बंद शेवटची तारीख कधी? इथं पहा

ऑनलाइन आधार कसे अपडेट करावे?

1) UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला www.uidai.gov.in ला भेट द्या.
2) My Aadhaar पर्यायावर क्लिक करून Update Your Aadhaar निवडा.
3) Update Aadhaar Details (Online) मध्ये जाऊन Document Update वर क्लिक करा.
4) आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा आणि Send OTP वर क्लिक करा.
5) मिळालेला OTP टाकून लॉगिन करा.
6) अपडेट करायची माहिती निवडा, आवश्यक माहिती भरा, आणि कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. नंतर Submit वर क्लिक करा.
7) तुम्हाला एक URN (अपडेट रिक्वेस्ट नंबर) मिळेल, ज्याद्वारे तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकता.

📢 हे पण वाचा :- लाडक्या बहि‍णींना मिळणार 2100 तसेच वीजबिलात ही सूट एकनाथ शिंदेनी केल्या 10 मोठ्या घोषणा

ऑफलाइन आधार कसे अपडेट करावे?

1) UIDAI च्या संकेतस्थळावरून आधार अपडेट फॉर्म डाउनलोड करा.
2) फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार केंद्रावर जमा करा.
3) तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल आणि तुम्हाला URN दिला जाईल. ऑफलाइन प्रक्रियेसाठी काही शुल्क आकारले जाईल.

Leave a Comment