Voter ID Kase Kadhave in Marathi | मतदान कार्ड नवीन कसे बनवायचे ?

By Bajrang Patil

Updated on:

Voter ID Kase Kadhave in Marathi : नमस्कार सर्वांना, आज या लेखात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. तुम्हाला माहितच आहे की आता आधार कार्ड प्रमाणेच मतदान कार्ड अर्थात वोटर आयडी कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र ठरला आहे.

आता तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही मतदान करू शकता आणि अनेक ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पुरावा अनेक कामांसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

तुम्ही आता घरबसल्या मतदान कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड आहे हे ऑनलाईन काढू शकता. मतदान कार्ड ऑनलाइन कसे काढावे ? मतदान कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ? आणि अर्ज प्रोसेस ही माहिती आज पाहूया.

Voter ID Kase Kadhave in Marathi

तुम्हाला माहितीच आहे की मतदान कार्ड असणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी ऑनलाइन वोटर आयडी कार्ड कसे बनवायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला खाली घेण्यात आलेली आहे.

त्या पद्धतीने तुम्ही मतदान कार्ड ऑनलाईन अर्ज करून बनवू शकता. खाली शेवटी व्हिडिओ सुद्धा देण्यात आलेला आहे, व्हिडिओ पहा या बटनवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ पाहून सुद्दा मतदान कार्ड ऑनलाईन अर्ज करून मिळवू शकतात.

📝 हे पण वाचा :- शबरी घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे ?

 • ऑनलाइन व्होटर आयडी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जावं लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला VOTERS’ SERVICE PORTAL वर क्लिक करावं लागेल.
 • यावर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल.
 • यावर New registration वर क्लिक करावं लागेल.
 • तुमच्यासमोर आता एक नवा फॉर्म ओपन होईल.
 • या ठिकाणी तुमच्याकडे मागितलेली सर्व माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा.
 • सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म जमा होईल.
 • सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला सरकारकडून एक लिंक पाठवली जाईल.
 • ज्याद्वारे तुम्ही व्होटर आयडीचं स्टेटस चेक करू शकता.
 • 10 ते 12 दिवस किंवा महिन्याभरासाठी तुम्हाला व्होटर आयडीसाठी वाट पाहावी लागेल.
 • या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन व्होटर आयडी बनवण्यासाठी अर्ज करू शकता.

📝 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment