Soybean Gogalgai Niyantran | सोयाबीन लागवड केली का ? सोयाबीन धोक्यात असे करा गोगलगाय नियंत्रण

By Bajrang Patil

Published on:

Soybean Gogalgai Niyantran :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये सोयाबीन लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोयाबीन लागवड केली असेल तर त्यावरती गोगलगाय मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

यावरती नियंत्रण आपल्याला कसं मिळवता येईल. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. गोगलगाय नियंत्रण कसे करावे. संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Soybean Gogalgai Niyantran

गोगलगाय ही एक बहुभक्षी किड आहे. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे आधाशासारखे खाऊन नुकसान करते. या किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आद्रता तसेच कमी तापमान (२० – ३२ अंश सेल्सिअस) पोषक आहे.
शंखीच्या अंगावर टणक कवच असते, तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते. गोगलगाय सरपटत चालते व चालताना सतत शेंबडासारखा चिकट स्ञाव सोडते, त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते.

सोयाबीन पिक गोगलगाय नियंत्रण 

शेतात हा स्ञाव वाळल्यावर त्या जागेवर पांढरा चकाकणारा पट्टा दिसतो. त्यावरून आपण या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखू शकतो. ही किड राञीच्या वेळी सक्रिय राहुन पिकाचे नुकसान करते.
परिचय व नुकसान : शंखीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांब गोलाकार कवच असते. बहुतांश शंखी गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. शंखी जमिनीवर पडलेली पिवळी पाने, फुले, फळे, शेणखत कुजलेला कचरासुध्दा खातात.

गोगलगाय नियंत्रण माहिती व उपाय 

राञी त्या आक्रमक होवून पानाला छिद्रे पाडतात. शंखीचा उपद्रव भाजीपाला पिकांचे रोपे, तसेच पुर्ण वाढलेली पपई, केळी, वाल, दोडक्याचे वेल. वांगी, भेंडीचे झाडे, काकडिवर्गिय पिके, मिरची, पानकोबी, फुलकोबी, ईतर सर्व प्रकारच्या पालेभाज्या पिकांवर होतो.
जिवनक्रम : एक मादी सरासरी ८० ते १०० अंडी एकाच वेळी पिकाच्या खोडाशेजारी. किंवा मुळाजवळ भुसभुशीत मातीत घालते. अशाप्रकारे एक मादी वर्षातुन ६ वेळा अंडी देते.
Soybean Gogalgai Niyantran
पिकांचे गोगलगाय पासून नियंत्रण 
सर्वसाधारण १७ दिवसांपर्यंत अंड्यातुन पिल्ले बाहेर येतात. त्यांची वाढ पुर्ण होण्यास आठ महिने ते एक वर्ष कालावधी लागतो. व्यवस्थापन • शेतात बांध स्वच्छ ठेवावेत व वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी.
गोगलगायीच्या लपण्याच्या जागा शोधून त्या सपाट कराव्यात. • सापळे- गोणपाट किंवा गवताचे ढिग गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी ठिकठिकाणी अंतरावीत. त्यावर गोगलगाय आकर्षित होईल.
सोयाबीन पिकांचे नियंत्रण 
बागेत सर्वसाधारणपणे दर वर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे. म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाहीत. • प्रभावी नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड २.५ टक्के घटक असणारे स्नेलकिल या कीटकनाशकाच्या वड्या तुकडे करून 4 किलो प्रति एकर.
याप्रमाणे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात गोगलगाय रेंगाळण्याच्या जागेवर, झाडांच्या बुडाजवळ, तसेच दोन ओळींच्या मध्ये ठेवाव्यात. • शेताच्या कडेने राख आणि तंबाखू पेंड बॉर्डर करायची म्हणजे कीड आत येणार नाही. अशाप्रकारे उपाययोजना केल्यास गोगलगायीचे चांगले नियंत्रण होते.

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment