Shetila Tar Kumpan Yojana | Shet Tar Kumpan Yojana | शेतीला लोखंडी तार कुंपण | शेतीला तार कुंपण अनुदान योजनेचा फॉर्म कसा भरावा ?

By Bajrang Patil

Updated on:

Shetila Tar Kumpan Yojana :- योजनेची उद्दिष्ट डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी

प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे. शेतीला लोखंडी तार कुंपण लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

Shetila Tar Kumpan Yojana

जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे. 90% अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात शेतीला तार कुंपण योजना उद्देश :- शेतीच्या कुंपण करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे.

पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते.  लाभाचे स्वरूप :- साधारणता दोन क्विंटल काटेरी तार सोबत 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.

शेतीला तार कुंपण योजना अर्ज करावा 

अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.

75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे. उद्देश :– पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75% टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.

लाभार्थी पात्रता व अनुदान 

जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत. लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के. अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.

विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.  अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ) इ. सादर योजनेचे कागदपत्रे/अर्ज कसा करवा हा व्हिडिओ पहा 

सादर योजना हि फक्त चंद्रपूर जिल्ह्यात राबवण्यात येत असते.ते हि ठराविक कालावधी मध्ये व त्याचबरोबर डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत राबवण्यात येणारी योजना फक्त पुढील ठिकाणी राबवली जाते याची नोंद घ्यावी.

📑 हे पण वाचा :- पोकरा योजना अंतर्गत 50% ते 100% अनुदान देणाऱ्या योजनांची यादी आली पहा लगेच

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment