Shet Panand Raste Yojana | शेत रस्ता योजना | शेत पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र | शेत रस्ता मंजूर गावनिहाय यादी पहा

By Bajrang Patil

Updated on:

Shet Panand Raste Yojana :- नमस्कार शेतकऱ्यांना व राज्यातील गावकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना २०२२ अंतर्गत शेत रस्ते मंजूर करण्यात आलेले आहे अन त्या आराखड्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे.

याचा शासन निर्णय २५ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. आणि यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात किती किलोमीटरचा रस्ता होणार आहे कुठून कुठपर्यंत होणार आहे.

याबाबत संपूर्ण माहिती तसेच कोणत्या गावांची रस्ते मंजूर झालेले आहे याची यादी सुद्धा या शासन निर्णय मध्ये दिलेली आहे. तर हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे यामध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे.

Shet Panand Raste Yojana

शेत/पाणंद रस्ते तयार करण्यासाठी शासन निर्णयात नमूद केलेल्या आवश्यक बाबी विचारात घेतल्यास  i) एक किमी खडी करणासह पक्कया रस्त्याचे अंदाजपत्रक आज रोजी अंदाजे रु.२३,८४,८५६ रकमेचे होते. मनरेगा – [- अकुशल -रु.९,०२,८७९ -रु.६,०१,९१९

राज्य रोहयो – कुशल – रु.८.८०.०५८ एकुण – रु.२३,८४,८५६ स्थानिक भौगोलिक परिस्थिती, मुरुम व खडी वाहतुकीचे अंतर इत्यादी बाबी मुळे अंदाजपत्रकाची रक्कम कमी-जास्त होऊ शकेल. तसेच, DSR बदलल्याने सुध्दा हे बदलेल. सदर अंदाजपत्रकात पुढील रकमांचाही समावेश आहे.

रॉयल्टी -रु.२,०४,३४७ जी.एस.टी -रु.१.५१.६२७ एकूण -रु.३,५५,९७४ म्हणजेच अकुशल कामासाठी रु.९,०२,८७९ व त्या प्रमाणात कुश रु.६,०१,९१९ हे मनरेगातून अनुज्ञेय होतील आणि पूरक कुशल खर्चासाठी रु.८,८५ 6 / 16 रोहयोतून उपलब्ध करुन दिले जातील.

पूरक कुशल निधीची तरतुद “शेत/पाणंद रस्ते योजना” या लेखाशिर्षात करण्यात येईल व मागणी प्रमाणे निधी वितरित करण्यासाठी ऑनलाईन (ONLINE) प्रणाली विकसित करण्यात येईल. अथवा सध्याच्या नरेगा पोर्टलवर वेगळी लिंक(LINK) उपलब्ध करुन देण्यात येईल.

एक किलोमीटर मुरुमाच्या पक्क्या रस्त्याचे अंदाजपत्रक आज रोजी अंदाजे रू.९,७६,४२०/- इतक्या रकमेचे होते. मनरेगा अकुशल- रु.७,५८,६८३/-  रु.२.१७.७३७ /- एकुण – रु.९,७६,४२०/- असे एकूण अनुदान ९ लाख ७६ हजार ४२० रु. एवढे अनुदान देय राहील.

📑 हे पण वाचा :- अरे बाप रे ! 12 वर्षापेक्षा जास्त काळ तुमची जमीन,घर दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर मालकी कोणाची ? पहा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय लगेच !

शेत पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र

कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावात किती रस्ता होणार आहे. व कुठून ते कुठपर्यंत होणार आहे, याबाबत ची यादी पाहण्यासाठी खाली दिलेला यादी डाऊनलोड करून आपण पाहू शकता.

ग्राम पंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या शेत/पाणंद रस्त्यांचा आराखडा (यादी) ग्राम सभेच्या मंजुरीने ग्राम पंचायत तयार करेल. (दिनांक ३१ मे पर्यंत) वरील प्रमाणे तयार करण्यात आलेली प्रत्येक ग्रामपंचायतीची शेत / पाणंद रस्त्यांची

यादी गट विकास अधिकारी एकत्रित करतील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करतील. (१५जून पर्यंत) मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची यादी एकत्रित करुन आराखडा सचिव (रोहयो) यांच्याकडे सादर करतील.

येथे शासन निर्णय डाउनलोड करा

Palakmantri Shet Panand Raste Yojana

(३० जून पर्यंत) सचिव (रोहयो) हे सर्व जिल्हयांच्या प्राप्त आराखडयानुसार उपलब्ध निधीच्या मर्यादेत पुरक निधी. मंजुरीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मा.मंत्री रोहयो यांच्याकडे सादर करतील. (३१ जुलै पर्यंत) मा.मंत्री रोहयो हे जिल्हानिहाय,

ग्रामपंचायत निहाय, शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक निधी मंजुर करावयाच्या यादीस मान्यता देतील. (१५ ऑगस्ट पर्यंत) २५ जानेवारी २०२२  शासन निर्णय :- येथे पहा आणि १० नोव्हेंबर २०२१  शासन निर्णय :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment