Sheli Palan Anudan Yojana Form | पोकरा शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म पहा माहिती

By Bajrang Patil

Published on:

Sheli Palan Anudan Yojana Form :- नमस्कार सर्वाना आजच्या या लेखात शेळी पालन योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पोकरा योजनाअंतर्गत शेळी पालन योजना या अंतर्गत लाभ कसा घ्यावा. कागदपत्रे,पात्रता, पहा संपूर्ण माहिती. लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sheli Palan Anudan Yojana Form

नानाजी देशमुख कृषी संजीवनी बंदिस्त शेळीपालन :-  अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात. ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फ़ोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधिल महिला शेतकरी.

अर्थसहाय्य किती मिळते-  खर्चाच्या 75 टक्के.  एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल. देय अनुदान थेट लाभार्थ्याच्या   आधार संलग्न बँक खात्यात  जमा करण्यात येते. 
                             

किती शेळ्या खरेदी कराव्या लागतात ?

जास्तीत जास्त 10 शेळ्या व एक बोकड खरेदी साठी अनुदान देय आहे.  उस्मानाबादी/संगमनेरी 10शेळ्या व एक बोकड खरेदी करण्यासाठी विमासह रु.70000 इतका खर्च गृहित धरण्यात आलेला आहे. 
अन्य जातिच्या पैदासक्षम 10 शेळ्या व एक बोकड खरेदी साठी विमा सह रु.47000 इतका खर्च गृहित धरण्यात आलेला आहे.  यापेक्षा कमी शेळ्या खरेदी केल्यास खरेदी शेळ्यांच्या प्रमाणात अनुदानाचा लाभ देय आहे. लाभार्थ्याने  सदरचा व्यवसाय किमान 3 वर्ष करणे आवश्यक.
                                      
अर्ज कुठे करावा किंवा कसा करावा ? 
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.  खरेदी कोठून करावी-  लाभार्थी ने पुर्व संमती.
मिलाल्यापासून एक महिन्याच्या आत खरेदी समितीच्या उपस्थितीत बाजार समिती मधून शेळ्या खरेदी कराव्यात. वाहतुकीचा खर्च लाभार्थीने करावा.खरेदीसमिती चे अध्यक्ष  हे सरपंच असतात.
Sheli Palan Anudan Yojana Form
शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु  
उपसरपंच, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यां पैकी 1 महिला सदस्य, कृषी मित्र/कृषी ताई, पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक हे सदस्य असतात. तर कृषी सहाय्यक हे सचिव असतात.       
Sheli Palan Anudan Yojana Form

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment