Saban Vyavsay Kasa Karava | हा व्यावसाय कराल तर कमवाल लाखों रुपये, अन कधीही न बंद पडणारा हा व्यवसाय, वाचा कमाई करून देणाऱ्या व्यवसाय बद्दल माहिती व सुरु करा लगेच

By Bajrang Patil

Updated on:

Saban Vyavsay Kasa Karava :- सध्याच्या काळात नोकरी मिळवणे किंवा नोकरी मिळणे हे फारच कठीण झाले आहे. अशातच आता नवयुवक हे थेट व्यवसाय कडे वळत आहे, परंतु व्यवसाय कडे वळत असताना बरेच गोष्टींचा अभ्यास त्यात लागतो. म्हणजेच तुम्ही व्यवसाय कोणता सुरू करत आहात ?

त्यातून तुम्हाला नफा किती होईल ?. आणि जो काही व्यवसाय आहे हा दीर्घ काळ कसा चालेल ? याची माहिती नसताना व्यवसाय सुरू केल्यावर तो नाफ्यात न येतात तोट्यात जाऊ शकतो. त्यानंतर व्यवसाय परवडत नाही किंवा व्यवसायात लॉस झाला म्हणून आपण त्याचा दिंडोरा फिरवत असतो.

आज अशा व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत, जो कधीही बंद न पडणारा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय केला तर मोठी कमाई सुद्धा होईल. आणि सरकार यात तुम्हाला मदत देखील करते. याचीच माहिती आज पाहणार आहोत.

Saban Vyavsay Kasa Karava

जे काही नोकर वर्ग आहे, सध्या नोकरी करत आहे, अशा लोकांना देखील नोकरीचा कंटाळा आलेला असतो. कारण रोजचे Schedule असतं, हे सारखच असतं. दुसरं कुठल्याही काम त्यात करता येत नाही किंवा फ्रीडम नसतो. त्यामुळे जे काही नोकरवर्ग आहे

हे देखील व्यवसाय कडे वळत आहे. असं विचार केला तर सध्या कधीही न बंद पडणाऱ्या व्यवसायाची माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. तुम्ही देखील व्यवसाय करायचा असेल तर हा आर्टिकल संपूर्ण वाचायचा आहे.

हा व्यवसाय करून तुम्ही दीर्घकाळ यातून पैसा कमवू शकतात हा असा व्यवसाय आहे. हा व्यवसाय गरीब, श्रीमंत, गाव, शहर असे कोणतेही ठिकाण प्रति व्यक्ती अंग स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करत असतो. आणि साबणाचा व्यवसाय हा कधीही न बंद पडणार आहेत.

साबण व्यवसाय कसा करायचा

कारण प्रत्येकाला हा साबण आवश्यकच आहे, अनेक जण आपल्या आवडीनुसार सुगंधित साबण वापर करतात. यात कमीत गुंतवणूक करून तुम्ही अगदी घरबसल्या व्यवसायला श्री गणेशा करू शकतो. याच व्यवसायाची अधिक माहिती पाहणार आहोत.

सरकार यासोबत काय मदत करते ? हे थोडक्यात आधी पाहूया. साबण व्यवसाय हा खूप फायद्याचा आहे, लागणाऱ्या मशीन आणि इतर खर्चासाठी मोदी सरकार तुम्हाला कर्ज देखील देत असते. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ घेता येतो. साबणाचा कारखाना टाकण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.

📒 हे पण वाचा :- प्लॅस्टिक बादल्या कशा बनवायच्या ? या व्यवसाय बद्दलची माहिती जाणून घ्या

Soap Business Ideas

यासाठी तुम्हाला 80% पर्यंत कर्ज दिले जाऊ शकतात. यामध्ये काही अटी, शर्ती राहू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे सिबिल स्कोर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला कोणतीही बँक किंवा सरकारकडून कर्ज मिळवण्यास कोणतीही अडचण येत नाही.

साबण जे आहेत ही अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वापरत असतात. त्यामुळे हा व्यवसाय कधीही न बंद पडणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

कोणती बँक कर्ज देईल ?

साबणाचा कारखाना उभारण्यासाठी 15 लाख 30 हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो. आणि 3 महिन्याचे खेळते भांडवल, यंत्र, सामग्री अशा गोष्टींचा विचार केला तर 15 लाख हे रक्कम मोठी वाटत असली तरी तुम्हाला यातील फक्त 30 टक्के रक्कम गुंतावी लागते. उर्वरित 80% रक्कम मुद्रा योजना या योजनेतून मिळवता येते.

📒 हे पण वाचा :-  या जातीच्या शेळीचे पालन करून कमवा लाखो रु. तब्बल देते 5 लिटर दुध पहा संपूर्ण माहिती

साबण व्यवसाय कमाई किती होते ?

मुद्रा योजनेचा लाभ घेत ही योजना सुरू केली तर वर्षाला 4 लाख किलोचे साबण उत्पादन करता येतं. आणि मिळणारा नफा दरमहा 50 हजार रुपये कमवता येतात. 4 लाख किलो उत्पादनानुसार तुम्हाला 47 लाखांचा यात फायदा होतो. कर्ज आणि इतर खर्च वजा केल्यावर महिन्याला तुमच्या हातात 50 हजार रुपये हे पडतील.

साबण कोणत्या श्रेणीनुसार बनवायच्या ?

साबण हा विविध श्रेणीमध्ये येतो जसा की :- साधा, सुगंधी, कपडे, भांडी, औषधी, असे साबणीची प्रकार आहेत. किंवा एखाद्या रोगासाठी डॉक्टर स्पेशल साबण सुचवतात अशा साबण देखील तुम्ही तयार करू शकतात, तुमच्या सोयीने त्यात नावीन्य आणू शकतात. साबणाची असलेली मागणी आणि

बाजारभाव या गोष्टी लक्षात घेऊन व्यवसाय केल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तर अशा प्रकारच्या काही बिझनेस आयडियाज ज्याचा तुम्ही विचार करा आणि जे काही तुमचं व्यवसायाचे प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये हा समावेश करा आणि व्यवसाय फायदेशीर करा. अशाच बिजनेस आयडियासाठी आपले वेबसाईटला भेट देत रहा.

📒 हे पण वाचा :- अरे व्हा ! आता शेतकऱ्यांना ही बँक काहीही न गहाण ठेवता देतीय तब्बल एवढे कर्ज पहा सविस्तर माहिती

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment