Pikavar Tannashak Favarle Upay | शेतातील पिकावर तणनाशक फवारल्या गेले किंवा स्प्रे पंप तणनाशकचा होता मग हे रामबाण उपाय लगेच करा

By Bajrang Patil

Published on:

Pikavar Tannashak Favarle Upay :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आज शेतामध्ये आपण कोणतेही पीक लावले असेल. आणि त्यावरती चुकून आंतरप्रवाही तणनाशक फवारले गेले असल्यास त्यावरती उपाय योजना काय आहेत ?. पिकांचे होणारे नुकसान कसे टाळू शकतात. त्यावरती नेमका उपाय काय करायचा आहे ?, तननाशकच्या पंप असेल त्याने फवारले गेले असेल ?, तर त्याचा होणारे नुकसान हे आपण कसे टाळू शकतो. त्यासाठी काय उपाययोजना आहेत ?. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे.

Pikavar Tannashak Favarle Upay

पिकावर चुकून आपल्याकडून तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये. आपण पाणी फवारले तर संपूर्ण झाड पाणी ही शोषून घेते आणि ते तननाशकाच्चा परिणाम दोन पटीने जास्त वाढतो. आणि झाड पीक जवळपास नष्ट होण्यास सुरुवात होते. तसेच स्पर्शजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याचे फवारल्याने धुऊन काढले तरी चालते. त्यामुळे आपण फवारलेले तणनाशकाची तीव्रता निश्चित कमी होते. तर चुकून तननाशक फवारले गेले असेल ?, त्यावर एकच रामबाण उपाय आहे. तो म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी 75 gm सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम DAP {डायअमोनियम फॉस्फेट चे झाड ओले होईल अशी फवारणी करावी.

पिकावर  तणनाशक फवारल्या गेले त्यावरील उपाय

यामध्ये महत्त्वाची टीप :- डी ए पी 2 तास भिजून वस्त्रगाळ करून घेणे. म्हणजेच पूर्ण पाण्यात भिजवून पूर्ण वस्त्रगाळ झालेली असणे गरजेचे आहे. गुळ आणि डीएपी चे द्रावण बाधित पिकावर सात/सात तासांच्या अंतराने 4 वेळा फवारणी करावी. असे केल्यास 90% ते 95% टक्के तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो. बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी. त्या पिकावर पाणी फवारू नये, पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

तणनाशक वर रामबाण उपाय 

आपण चुकून तणनाशक फवारले असल्यास कधीच पाण्याने फवारणी करू नये, किंवा धुऊ नये. त्यांचा परिणाम हा 2 पटीने वाढत असतो. आणि त्यानंतर स्पर्षंजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुऊन काढले तरी चालणार आहे याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण फवारलेले तणनाशकची तीव्रता किती आहे ?, हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. तननाशक कोणता आहे, हे जाणून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे आपण फवारणी केली असल्यास अशाप्रकारे आपण त्यावर नियंत्रण 90% ते 95% टक्के नक्कीच मिळू शकतात.


📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment