Ova Lagwad Kashi Karavi in Marathi | ओवा लागवड कशी करावी ?

Ova Lagwad Kashi Karavi in Marathi

Ova Lagwad Kashi Karavi in Marathi : राज्यात सरकारने जरी दुष्काळ जाहीर केला नाही तरी शेतीसाठी कोणती पीक घेऊ शकतो, लागवड दसरा विषयी लागवड तंत्र नुसार या पिकाची ओवा काही गावरान जातींची ही पेरणी तुम्ही करू शकता.

कारण ओव्याच्या महाराष्ट्र सरकारने जरी दुष्काळ जाहीर केला नाही तरीही सध्या दुष्काळी परिस्थिती हे वास्तव आहे. त्यामुळे आपण पीक संरक्षणाच्या बाबत व कमी पाण्यात रब्बी हंगामासाठी कोणती पिकं घेऊ शकतो ? हे पाहतोय.

त्यात आपण आज माहिती घेणार आहोत ती ओवा या पिकाची हे पीक नेमकं किती दिवसात येतं ? बियाणे कुठे मिळतं ? ओवायला मार्केट कुठे आहे ? भाव काय मिळतोय आणि लागवड तंत्र विषयीची सगळी माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजी नगर चे डॉक्टर किशोर झाडे यांनी ही माहिती दिली आहे.

Ova Lagwad Kashi Karavi in Marathi

ओवा या पिकावंर कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसलेला पीक म्हणून आपण ओवा पिकाकडे पाहू शकतो. कारण कमी उत्पादन खर्च आणि जास्त काळ साठवण करता येत असल्यामुळे चांगला भाव मिळण्याची क्षमता जास्त असते. या पिकातील राजस्थान व गुजरातच्या काही भागांमध्ये ओव्याची लागवड केली जाते. पण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कमी पावसाच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ओव्याला प्रमुख पीक बनवला आहे. त्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशातला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्याची ही गरज आहे.

ओवा पेरणी तंत्रज्ञान व पेरणी कालावधी ?

वेगवेगळ्या विभागातल्या परिस्थितीनुसार या पिकाची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत करता येते. तुमच्याकडे कमी पाणी असेल तर ओवा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फक्त लागवड व तयार होताना वातावरण पूर्ण आणि पाऊस नसेल अशा प्रकारे आपल्याला याची पेरणी करायची आहे. हे पीक 150 ते 160 इतक्या कमी दिवसात येणार आहे. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी गाळयुक्त जमीन निवडायचे आहेत.

पेरणीसाठी किती बियाणे लागते ? व उत्पादन ?

अडीच ते तीन क्विंटल ओवा बियाणे लागते. यांचे अंतर 20 ते 30 सेंटीमीटर मध्ये ठेवायचे आहेत. एक ही पाणी न देता उपलब्ध ओव्यावर एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळतं आणि जर पाणी असेल तर हे उत्पादन वाढत जातं, म्हणजेच पाण्याची सोय असल्यास एकरी दहा क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकत.

ओवा पीक संरक्षण व माहिती

मावा कीड आणि बुरीरोग वगळता इतर रोगांचा यावर फारसा प्रादुर्भाव होताना दिसत नाही. काढली नंतर ओवा जास्त काळ ठेवता येतो.

ओवा बियाणे कुठे मिळते ?

महत्त्वाचं म्हणजे काय त्याचा बियाणं कुठे मिळेल तर ओव्याचं बियाणं तुम्हाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मिळू शकतो। विद्यापीठाणे महाराष्ट्रासाठी विकसित केले, याशिवाय ओव्याच्या काही गावरान जाती तुम्ही करू शकता. कारण ओव्याच्या गावरान जातीना मार्केटमध्ये चांगला भाव येतो.

ओवा मार्केट कुठे व कसे भाव किती मिळतो ?

तुम्ही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या लासुर स्टेशन येथे बाजार विक्री करू शकता. शेगाव, नंदुरबार, या ठिकाणी आपल्या भागातल्या आठवडी बाजारात ही तुम्ही ओव्याची विक्री करू शकता. प्रतवारी यासह आकर्षक पॅकिंग केली तर उत्तम ब्रांड तयार होऊ शकतो. या पिकावर आधारित एखाद्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य झाल्यास जास्त दर आणखी मिळू शकेल.

याला प्रतवारीनुसार दहा ते बारा हजार रुपये इतका भाव मिळू शकतो. बेकरी इंडस्ट्रीज, वाइन इंडस्ट्रीज, मसाले उद्योग, आणि आयुर्वेदिक क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर याची मागणी वाढत आहेत. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी नक्की विचार करा. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद……

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top