Maha Dbt Farmer Scheme | Mahadbt Shetkari Yojana Online Form | कृषि यांत्रिकीकरण अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? | महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना

By Bajrang Patil

Updated on:

Maha Dbt Farmer Scheme :- कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.  जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे.

अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

Maha Dbt Farmer Scheme

 1. ट्रॅक्टर
 2. पॉवर टिलर
 3. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
 4. बैल चलित यंत्र/अवजारे
 5. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
 6. प्रक्रिया संच
 7. काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
 8. फलोत्पादन यंत्र/अवजारे
 9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
 10. स्वयं चलित यंत्रे

कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता 

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
 •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
 •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
 •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा :- एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

📑 हे पण वाचा :- कोणत्या योजनेसाठी किंवा कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळते ? येथे क्लिक करून pdf डाउनलोड करा

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी  अर्ज 

कृषि यांत्रिकीकरण योजनांचा लाभ व संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व Online पद्धतीने अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणकोणती लागणार असा करा अर्ज Video येथे पहा 

Tractor Anudan Yojana Dacuments

 •  आधार कार्ड
 •  ७/१२ उतारा
 •  ८ अ दाखला
 •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 •  जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमाती साठी)
 •  स्वयं घोषणापत्र
 •  पूर्वसंमती पत्र

📑 हे पण वाचा :- संत तुकाराम महाराज यांचा जन्म कधी झाला? | संत तुकाराम माहिती मराठी | संत तुकाराम यांची संपूर्ण माहिती मराठीमध्ये

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment