Khekada Palan Kase Karave | खेकडा पालन विषयी माहिती | गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे करावे ? जाणून घ्या प्रशिक्षण ते उत्पादन संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा !

By Bajrang Patil

Published on:

आज या लेखाच्या माध्यमातून शेतकरी बांधव तसेच व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वाधिक नफा मिळवून देणारा Khekada Palan Kase Karave व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत.

गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे करावे ?. खेकडा पालन व्यवसाय करत असताना कोणत्या बाबींचा आपल्याला काळजी घ्यावी लागते ? कोणत्या खेकड्यांचे पालन करणे फायद्याचे आहे ?.

किती नफा मिळतो ?, खेकड्यांचे प्रकार किती आहे ?, गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे सुरु करावे ?. खेकडे पालन करण्यासाठी जागेची निवड आणि त्यानंतर त्याचे पालन कसे करायचे आहे ? खेकड्यांची पिल्ले कुठून विकत घ्यावी ?, खेकड्यांना चारा कोणता घालावा लागतो ? खेकड्यांची विक्री कशी आणि कुठे करावी ?.

Table of Contents

Khekada Palan Kase Karave

खेकडा खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ? खेकडा अनुदान सरकार कडून मिळते का ? ही संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम व्यवसाय सुरू करत असताना गोड्या पाण्यातील किंवा अन्य खेकडे पालन याची संपूर्ण माहिती त्यात अभ्यास करून या क्षेत्रात पाऊल टाकावे, व्यवसाय सुरू करावे.

जेणेकरून तुम्हाला खेकडा पालन संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही. तर याच विषयीची माहिती जाणून घेऊया. गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसायाची डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत.

Khekada Palan

खेकडा पालन व्यवसाय कसा करावा ?

खेकडे पालन व्यवसाय कसा करावा त्याचा व्यवसाय कशा पद्धतीने होतो त्यातून उत्पादन कसे मिळते ? याची माहिती जाणून घेऊया. गोड्या पाण्यातील खेकडा पालन

म्हणजे एखादा टॅंक बनवून त्यामध्ये खेकड्यांचे लहान पिल्ले सोडणे. आणि त्यांना चारा जो आहे खाण्यासाठी टाकावा, पिल्ले मोठी झाल्यानंतर मार्केटमध्ये विकली जातात,

त्यातून तुम्हाला चांगला मोठा नफा मिळत असतो. आणि बाजारात विकण्यासाठी जवळजवळ एक वर्षाचा कालावधी यासाठी लागत असतो.

खेकडा पालन जातीलहान प्रजातींना लाल पंजे, हिरव्या मातीचा खेकडा
हिरवा मातीचा खेकडा22 सेंटीमीटर, किलो पर्यंत वजन
लाल पंजा खेकडा पालनजास्तीत जास्त 13 CM, वजन 1.2 किलो
गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे करावे ?2000 ते 2500 हजार पर्यंत खेकडा पालन करण्यासाठी 25*25 आणि 7 फूट उंचीचा हा टॅंक
खेकड्यांना चारा कोणता लागतो ?आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा खायला, मासे जे लोक विकतात, वेस्ट किंवा सुकत टाकावे
खेकडा खाण्याचे फायदे काय मिळतो ?खेकडा खाल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो अनेक फायदे मिळतात

खेकडा पालन जाती कोणकोणत्या आहेत ? नाव व माहिती !

खेकडा पालनात 2 प्रकार पडतात. या जाती कोणत्या ? एक लहान जाती आणि दुसरी मोठी जाती, तर अशा दोन प्रकारच्या दोन जाती यामध्ये पाहायला मिळतात.

  • लहान प्रजातींना लाल पंजे म्हणून ओळखले जाते, दुसरा हिरव्या मातीचा खेकडा असे यांचे नाव आहेत. यांना ग्रीन मड म्हणून ओळखलं जातं, किंवा यांना नावे देण्यात आलेले आहेत.
  • स्क्यल्ला जातीचे खेकडे ये नदी, नाले, समुद्र किनारी जिथे पाणी स्थिर आणि अस्वच्छ पाणी असते त्या ठिकाणी आढळून येतात. गोड्या पाण्यातली खेकडे पालन याला आपण मड खेकडे पालन असे म्हणू शकतो, असे खेकड्यांचा प्रकार असतो.
Khekada Palan

खेकड्यांचा प्रकार किती असतात ? / खेकडा पालन प्रजाती

खेकड्यात एकूण दोन प्रकार पडतात. त्यातील एक लाल पंजा, आणि दुसरा हिरवा मातीचा खेकडा असे प्रकार आहेत.

हिरवा मातीचा खेकडा

जो आहे हा आकाराने मोठा असतो. आणि याची जास्तीत जास्त 22 सेंटीमीटर पर्यंत वाढ होऊ होते. आणि याचं जे काही वजन आहे हा तब्बल 2 किलो पर्यंत याच वजन राहते, हा खेकडा मोकळा पाण्यामध्ये आढळून येतो. या खेकड्याला मोकळ्या पाण्यात राहण्याची सवय असल्याने याच्या अंगावर बहुभुज्य खुणा तुम्हाला पाहायला मिळतात.

लाल पंजा खेकडा पालन व त्याची माहिती

लाल पंजा खेकडा हा हिरव्या मातीच्या खेकड्यापेक्षा लहान आहे. याची जास्तीत जास्त 13 CM पर्यंत वाढ होते. आणि त्याचं वजन 1.2 किलो पर्यंत वाढतो. या खेकड्याला मातीमध्ये बसून घेण्याची सवय

असल्यामुळे त्याच्या अंगावर अनेक खुणा देखील आढळून येतात. खेकडा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे खेकड्यांचे पालन करता येते. या दोन्ही खेकड्यांविषयी वर माहिती जाणून घेतलेली आहे.

वरील खेकड्यांच्या प्रजातीना सध्या मार्केटमध्ये याची डिमांड मोठ्या प्रमाणावर असल्याने याला चांगला भाव मिळत आहेत.

Khekada Palan Kase Karave

📋 हेही वाचा :- आता या योजनेतून सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शेळी मेंढी पालनासाठी 75% अनुदान थेट मिळणार, फक्त हे कागदपत्रे लागेल, त्वरित भरा फॉर्म !

गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे सुरू करावे ? / Khekada Palan Kase Suru Karave ?

सुरुवातीला सखोल ज्ञान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही खेकडा पालन व्यवसाय सुरू करू शकतात. चला तर पाहुयात खेकडा पालन व्यवसाय बद्दल माहिती.

खेकडा पालन व्यवसाय किंवा इतर कोणत्याही वेबसाव्यवसायईट तुम्हाला करायचा असेल, तर त्याचे सखोल ज्ञान तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही यशस्वी व्यवसाय करू शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी टॅंक कसा बनवायचा ? खेकड्याची बी किंवा पिल्ले कुठून तुम्हाला विकत घ्यायची आहे ? किंवा कुठे तुम्हाला खेकड्यांचे जे पिल्ले आहेत ते मिळतात ?. त्यांना खायला काय लागते ? टॅंक मध्ये पाणी कोणत्या

प्रकारचे आणि कसे सोडावे ?. खेकडे मोठे झाल्यावर यासाठी मार्केट कसे शोधावे ?, त्याला किती भाव मिळू शकतो. त्यातून किती नफा मिळवू शकतो ? याची सखोल ज्ञान घेणे गरजेचे आहे.

Khekada Palan

खेकडा पालन करण्यासाठी जागेची निवड आणि टाकीचे बांधकाम कसे असावे ?

तुम्ही व्यवसाय सुरू करत असलेली जागा ही मोकळी आणि हवेशीर असं गरजेचं आहे. या सोबतच जवळ पाणी लाईट ही सुविधा असणं गरजेचं आहे. या जागेची निवड केल्यानंतर किती किलो पर्यंत

आणि किती खेकड्यांचे पालन करायचे आहे ? हे तुम्हाला त्यात ठरवावं लागेल. तुम्हाला 2000 ते 2500 हजार पर्यंत खेकडा पालन करण्यासाठी 25*25 आणि 7 फूट उंचीचा हा टॅंक बनवावा लागतो.

आणि टॅंकचे बांधकाम करत असताना पूर्णपणे RCC मध्ये याची बांधकाम करून घ्यावे लागत. कारण खेकडे हे दगडांमध्ये राहतात आणि त्यामुळे खड्डा लीक होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे या गोष्टींचा तुम्हाला बारीक लक्ष देणे गरजेचे आहे, सखोल ज्ञान घेऊन खेकडा पालन व्यवसाय सुरू करू शकता. खेकडा हा बाहेर जाऊ नये म्हणून त्यावरून तुम्हाला 2 ते 3 फूट उंचीचे आतल्या बाजूने फरशी बसवावी लागते.

Khekada Palan Kase Karave

📋 हेही वाचा :- तुम्हाला माहिती का ? महिलांसाठी पोस्टाची ही सुपर योजना ? थेट मिळतात 2 लाख रु. पहा अधिकृत माहिती, व घ्या लाभ !

टॅंकचे बांधकाम

त्याचा आतून नैसर्गिक पद्धतीचे वातावरण त्यात निर्माण करावे लागते. यासाठी आत मध्ये वाळू, माती, दगड, लहान झाडे, शेवाळ, निर्माण किंवा त्यात ठेवून तुम्हाला दोन-तीन फुटपर्यंत तयार करावे लागेल.

त्यानंतर टॅंक च्या आत मध्ये खेकड्यांना खाण्यासाठी देखील व्यवस्था तुम्हाला करावे लागते. त्यानंतर टॅंक मध्ये पाणी हे बोर किंवा विहिरीचे पाणी वापरणे गरजेचे आहे.

जर नगरपालिका, महानगरपालिका, पाणी पुरवठा यांचे पाणी टाळावे, कारण या पाणी फिल्टर किंवा पावडर वापर केलेला असतो. त्यामुळे खेकडे मरण पावतात, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही विहिरीच्या पाण्याने टॅंक भरा.

खेकड्यांचे पिल्ले कुठून विकत घ्यायची?

खेकड्यांची पिल्ले हे जवळच्या मार्केटमधून विकत घ्यावी लागतात. तुम्ही तुमचे जवळील मार्केटमध्ये विचारपूस करू शकता. किंवा तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी खेकडा पालन व्यवसाय सुरू आहे.

तिथे जाऊन खेकडा पालनची संपूर्ण सखोल ज्ञान घ्या त्यांच्याकडून खेकडा पालन आणि खेकड्यांची जी पिल्ले आहेत ते कुठून विकत घ्यावी यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून घ्या.

खेकड्यांची पिल्ले कुठून विकत घ्यायची याचा पत्ता देखील तुम्ही घेऊ शकतात. आता खेकड्यांची पिल्ले विकत घ्यायचे असल्यास तुम्हाला 200 ते 500 रुपये किलो पर्यंत हे तुम्हाला मिळतात.

याचे पिल्ले विकत घेत असताना मादी प्रजातीची पिल्ले जास्त प्रमाणात विकत घ्यावी. कारण एक मादी साधारणपणे 500 ते 1000 पिल्लांना जन्म देण्याची क्षमता असते. खेकड्यांची पिल्ले विकत घेण्याबरोबरच मोठी खेकडे देखील विकत घ्या. जेणेकरून मोठे पिल्ले हे लहान पिल्लांना जन्म देतात.

Khekada Palan Kase Karave

📋 हेही वाचा :- आता या सरकारी App च्या माध्यमातून एका क्लीकवर डाउनलोड करा तुमचे PF पासबुक, सरकारने नवीन App केले लॉन्च, पहा संपूर्ण माहिती !

खेकड्यांना चारा कोणता लागतो ? / खेकडा पालन कोणता चारा द्यावा ?

खेकड्यांना चारा जो आहेत हा आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा खायला तुम्ही देऊ शकता. त्यासाठी मासे जे लोक विकतात त्याचे वेस्ट किंवा सुकत टाकू शकतात. त्यासाठी जास्त खर्च तुम्हाला पडत नाही.

खेकड्यांची विक्री कुठे आणि कशी करावी ? /Khekda Palan Vikri Kashi Karavi ?

खेकड्यांची पिल्ले मोठे होण्यास 1 वर्षाचा जवळपास कालावधी लागतो. त्यानंतर त्याची विक्री तुम्ही करू शकता. आता खेकड्यांची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे, आणि खेकडा पालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात आता नफा मिळून देत आहे.

तुम्ही खेकडा मार्केट किंवा हॉटेल किंवा शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवू शकता. आज मार्केटमध्ये 1 हजार रुपये किलो पर्यंत खेकड्यांना दर हा मिळत आहेत. याची देखील खात्री करावी लागते, खेकडे पालन करण्यासाठी जी काही सखोल ज्ञान आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.

खेकडा खाण्याचे फायदे / खेकडा खाल्याने काय फायदे होतात/मिळतात

खेकडा खाण्याचे फायदे

मधुमेह रोखण्यासाठी लाभदायक :- तर खेकड्यांमध्ये क्रोमियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. आणि त्यासोबतच कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आढळते त्यामुळे आपली साखर नियंत्रणात राहते.
मधुमेह रोग रुग्णांसाठी सेवन केले जाते.

Herth Attack धोका हा कमी होतो :- खेकड्यांमध्ये ओमोनो 3 फ्याटी ऍसिड, नायसिन आणि क्रोमियमचे प्रमाण आढळून येते, रक्तात कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होण्यास देखील मदत होते.

खेकडा खाल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो :- खेकड्यांमध्ये शरीरामध्ये मिनरलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील एक्सीडेंट मुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती :- खेकडे खाल्याने मोठे प्रमाणात वाढते. निरोगी आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी खेकड्यांच्या सेवन फायदेशीर आहे.

सर्दी, खोकला, छातीमधील कप, असेल तर हा उपाय आहे. खेकड्याचे सेवन प्रोटीन मिळवण्यासाठी देखील केले जाते. खेकड्यांमध्ये विटामिन बी 12 चे प्रमाण आढळून येते. त्यामुळे रक्त पेशींची निर्मिती होते.

खेकड्यांचे सेवन केल्याने एनीमियाचा धोका कमी होतो. स्वतःचे वजन कमी करण्यास देखील खेकडा मोठा फायदेशीर आहे. गुडघे आणि सांधे दुखी उपचारांसाठी याचे सेवन देखील केले जाते.

Khekada Palan Kase Karave

📋 हेही वाचा :- गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची, तेही वार्डनुसार pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती !

खेकड्याला खाण्यासाठी काय लागते ? / खेकडा काय खातो ?

खेकडा आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा खायला लागते. त्यात जे मासे विकतात त्यांचे वेस्ट जे आहेत किंवा ते सुकत ते टाकू शकतात.

त्यामुळे तुम्हाला यासाठी खर्च जो आहे हा कमी लागतो. अशा प्रकारे तुम्ही खेकडा पालन करू शकता. अशा प्रकारचं या ठिकाणी मोठा नफा तुम्हाला यातून कमवता येतो.

खेकडा पालन प्रशिक्षण/खेकडा पालन प्रशिक्षण केंद्र/Khekada Palan Prashikshan

खेकडा पाण्याची प्रशिक्षण रत्नागिरीच्या कृषी विद्यापीठ मध्ये खेकडा पालनाचे 3 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. आणि सोबतच मत्स्य विद्यालय रत्नागिरी या ठिकाणी प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता.

योग्य प्रशिक्षण घेऊन खेकडा पालन सुरू करणे कधीही चांगलेच आहेत. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही सर्वप्रथम प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. किंवा ज्या ठिकाणी खेकडा पालन व्यवसाय सुरू आहेत.

अशा काही वर्षापासून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही खेकडा पालनात जे काही मालक आहे त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळवून घ्या. खेकडा पालन करण्याचे सखोल ज्ञान प्राप्त करून घ्या.

Khekada Palan Kase Karave

📋 हेही वाचा :-  ई पीक पाहणी 2.0.11 व्हर्जन | ई पीक पाहणी App चे नवीन व्हर्जन लॉन्च आता या पद्धतीने करा ई पीक पाहणी अन्यथा ?

Frequently Asked Questions (FAQ)

खेकडा पालन प्रशिक्षण/खेकडा पालन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र

खेकडा पाण्याची प्रशिक्षण रत्नागिरीच्या कृषी विद्यापीठ मध्ये खेकडा पालनाचे 3 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. आणि सोबतच मत्स्य विद्यालय रत्नागिरी या ठिकाणी प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता.

खेकड्याला खाण्यासाठी काय लागते ? / खेकडा काय खातो ?

खेकडा आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा खायला लागते. त्यात जे मासे विकतात त्यांचे वेस्ट जे आहेत किंवा ते सुकत ते टाकू शकतात.

लाल पंजा खेकडा पालन व त्याची माहिती

लाल पंजा खेकडा हा हिरव्या मातीच्या खेकड्यापेक्षा लहान आहे. याची जास्तीत जास्त 13 CM पर्यंत वाढ होते. आणि त्याचं वजन 1.2 किलो पर्यंत वाढतो. या खेकड्याला मातीमध्ये बसून घेण्याची सवय

खेकडा पालन जाती कोणकोणत्या आहेत ? नाव व माहिती !

लहान प्रजातींना लाल पंजे म्हणून ओळखले जाते, दुसरा हिरव्या मातीचा खेकडा असे यांचे नाव आहेत.

खेकडा खाण्याचे फायदे काय आहेत ?

Herth Attack धोका हा कमी होतो :- खेकड्यांमध्ये ओमोनो 3 फ्याटी ऍसिड, नायसिन आणि क्रोमियमचे प्रमाण आढळून येते, रक्तात कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होण्यास देखील मदत होते.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment