Jio New Recharge नमस्कार जिओ आणि इतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात मोबाईल दरात 22 टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमती अधिक वाढल्या आहेत. जिओसह सध्या 14 दिवसांच्या ते 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत.
ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्सपेक्षा 84 दिवसांच्या प्लॅन्सची किंमत कमी आहे, आणि म्हणूनच अनेक युजर्स 3 महिन्यांच्या प्लॅन्सवर रिचार्ज करतात.
Jio New Recharge 2024
जर तुम्ही जिओचे वापरकर्ते असाल आणि 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा 859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उत्तम पर्याय आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.
📢 हे पण वाचा :- या सरकारची योजनेत 1500 भरा आणि घ्या 4 लाख रुपयांसोबत या खास सवलती इथं पटकन पहा…!
त्याचप्रमाणे युजर्सना फ्री नॅशनल रोमिंग, दररोज 2GB डेटा, आणि 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा मिळतो. यामध्ये एक विशेष फायदा असा आहे की, जरी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असला.
Jio युजर्स Recharage
तुम्ही जिओच्या True 5G नेटवर्कवर असाल, तर तुम्हाला अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema एप्स आणि Jio Cloud कडेही प्रवेश मिळतो.
तसेच जिओचा 479 रुपयांचा दुसरा 84 दिवसांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 1,000 मोफत एसएमएस आणि 6GB हाय स्पीड डेटा मिळतो. हा प्लॅन विशेषता अशा युजर्ससाठी उपयुक्त आहे जे मुख्यता कॉलिंगसाठी नंबर वापरतात.