Jestha Nagarik Card Mahiti Marathi | अरे वा, आता ज्येष्ठ नागरिक कार्ड काढता येणार ऑनलाईन अगदी 5 मिनिटांत, बघा हा व्हिडीओ !

By Bajrang Patil

Published on:

Jestha Nagarik Card Mahiti Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे आणि कामाची माहिती जाणून घेऊया. Senior Citizen Card अर्थातच ज्येष्ठ नागरिक कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे काढावे ?. ऑनलाईन अर्ज कसा करावा ? ही संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेऊया.

ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार केल्यानंतर कोणकोणत्या यात सुविधा मिळतात ? हे जाणून घेऊया. आणि त्यासोबतच जेष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड हे बनवण्यात येते. ज्येष्ठ नागरिक कार्ड वर सरकारकडून अनेक सुविधा पुरवल्या जात असतात.

अद्याप तुम्ही हे ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवले नसेल तर आज ही माहितीमध्ये संपूर्ण प्रक्रिया तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र हे नावाने हे कार्ड ओळखले जाते. आताच याला ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा सिनिअर सिटीझन कार्ड हे म्हणतात.

Jestha Nagarik Card Mahiti Marathi

हे कार्ड खास वृद्धनागरिकांसाठी सरकारकडून बनवण्यात येते. या कार्डचा उपयोग करून ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या ओळखीबाबत सर्व माहिती मिळावी त्यांचा मुख्य उद्देश्य असतो. अनेक वैशिष्ट्ये आणि फायद्यांमध्ये या ज्येष्ठ नागरिक कार्डचे मिळत असतात जेष्ठ नागरिक कार्ड प्रत्येक राज्यातील

राज्य सरकार त्यांच्या राज्यातील 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी हे जेष्ठ नागरिक कार्ड तयार करत असते. या कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण माहिती दिलेली असते. जसे की रक्तगट, आपत्कालीन संपर्क नंबर, एलर्जी, व इतर औषधांची डिटेल जेष्ठ नागरिकांच्या द्वारे जेष्ठ नागरिकांना यातून सुविधा व लाभ अशा प्रकारे मिळत असतो.

या सोबतच केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबत खाजगी योजनांचा ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली असते. ज्येष्ठ नागरिकांना कर सवलत, कमी भावात विमान तिकिटे, कमी भावात रेल्वे तिकीट, कमी टेलिफोन शुल्क, आणि अनेक जे काही बस सेवाचा लाभ हा दिला जातो.

सीनियर सिटीजन कार्डचे फायदे कोणते?

ज्येष्ठ नागरिक कार्ड हे बचतीसह प्रवास करायला मदत करते. प्रवासात मोठी बचत करण्यासाठी तुमच्याकडे जेष्ठ नागरिक कार्ड हे असणे गरजेचे आहे.

  • रेल्वेच्या भाड्यामध्ये तुम्हाला 30% टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक कार्ड अंतर्गत मिळते
  • महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थातच MSRTC बस भाड्यावर आश्वासिनीय 50% सूट
  • निवडक विमान कंपन्यात हवाई प्रवासांच्या भाड्यावर 50% सवलत देतात ?

📑 हेही वाचा :- पर्सनल आणि गोल्ड लोन सोडा, येथे मिळतंय सर्वात स्वस्त लोन; पाहा किती आहे व्याजदर, किती व्याजदर ? वाचा डिटेल्स !

महाराष्ट्र राज्य परिवहन जेष्ठ नागरिक कार्ड

आणि सोबतच आरोग्याची काळजी घेणे सरकारी रुग्णालयाने दवाखाने येथे मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा ज्येष्ठ नागरिकाना मिळत असतात. त्याचबरोबर खाजगी रुग्णालय वैद्यकीय सेवेवर सवलत या ठिकाणी मिळते. विविध सेवा वर

ही वेगवेगळी सवलत किंवा सूट देण्यात येत असते. ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही आणखी फायद्यांसाठी पात्र असाल. जसे की पेन्शन, गृहनिर्माण मदत, रोजगारांच्या संधी अशा विविध असतात. तसेच महाराष्ट्र जेष्ठ नागरिक कार्डसाठी अर्ज करणे

आता खूप सोपे चाललेले आहे. आता ऑनलाईन अर्ज आपले सरकार (सरकारी) या पोर्टल वर ऑनलाईन करणे आवश्यक आहे. किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटर वर जाऊन करू शकता.

📑 हेही वाचा :- तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनेतून मिळेल 5 हजार रुपये, फक्त असा घ्या तात्काळ घ्या लाभ वाचा योजनेची डिटेल्स !

महाराष्ट्र जेष्ठ नागरिक कार्ड कागदपत्रे?

  • वयाचा पुरावा :- हा जन्म दाखला, पासपोर्ट, किंवा तुमची जन्मतारीख दर्शविणारा सरकारी इतर कागदपत्र जसे की जन्मदाखला, किंवा आधार कार्ड
  • राहण्याचा पुरावा :- ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार नोंदणी कार्ड, किंवा तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा इतर कागदपत्रे अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो छायाचित्र पांढऱ्या पार्श्वभूमीवर घेतलेले हवे.
  • तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यावर ज्येष्ठ नागरिक कार्ड तुम्हाला दिले जाते. हे कार्ड तुम्हाला वर दिलेल्या सर्व फायद्यांसाठी पात्र बनवत असते.

ज्येष्ठ नागरिक कार्ड पात्रता?

  • वयोमर्यादा :- महाराष्ट्रात जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी किंवा त्याचा अर्ज करण्यासाठी वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे.
  • रहिवासी :- ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी अर्ज करू इच्छिणारे लाभार्थी हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे ? किंवा जेष्ठ नागरिक कार्ड कसे बनवायचे यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेला YouTube व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानुसार तुम्ही हे ज्येष्ठ नागरिक कार्ड काढू शकतात.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment