Cibil Score Loan Eligibility | सिबिल स्कोर कसा चेक करायचा ?

By Bajrang Patil

Updated on:

Cibil Score Loan Eligibility :- आज महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का नाही हे नेमकं कशावरून ठरतं हे आज आपण जाणून घेऊया.

यासाठी तुम्हाला सिबिल स्कोर असणं फार गरजेचे आहे. सिबिल स्कोर म्हणजे काय? आणि सिबिल स्कोर किती असावा ?. यासंबंधीतील सविस्तर 05 अशा महत्वपूर्ण गोष्टी आज जाणून घेऊया.

कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँक आणि वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोर आधी तपासून घेते. त्यानंतर स्कोर कमी असेल तर कर्ज मिळण्यास अडचणी येतात.

या प्रसंगी कर्ज नाकारले देखील जाते. वित्तीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठी ही तुम्हाला सिबिल स्कोर चांगला असणं गरजेचं आहे.

आता अनेक कंपन्या उमेदवाराचा सिबिल स्कोर तपासतात आपला सिबील स्कोर चांगला कसा करावा याची माहिती थोडक्यात आपण पाहूया.

Cibil Score Loan Eligibility

सिबिल स्कोर बद्दल ठळक मुद्दे

 • सिबिल स्कोअर हा 300 ते 900 च्या आतील आकडा असतो.
 • सिबिलच्या रिपोर्टमध्ये एखाद्याची संपूर्ण आर्थिक कुंडलीच असते.
 • तुमच्या आर्थिक व्यवहाराचा संपूर्ण इतिहास त्यात असतो.
 • किमान एकदा कर्ज घेणे आवश्यक.
 • 18 ते 36 महिन्यांत सिबिल स्कोअर तयार होतो.

सिबिल काय सांगतो ?

 • 300 ते 350 आर्थिक पद कमजोर
 • 550 ते 650 सरासरी
 • 650 ते 750 उत्तम
 • 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो

सिबिल स्कोर 650 चे वर असल्यास बँक कर्ज देण्यास तयार होतात. अशा पद्धतीचे हे सिबील स्कोर असतात.

सिबिल स्कोर म्हणजे काय असते ?

सिबिल हे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेडचे लघुरूप आहेत. हे रिझर्व बँकेला माहिती देणाऱ्या कंपन्या पैकी एक कंपनी आहे. याशिवाय भारतात विक्स एक्सपेरियनयन आणि सीएफआय हायमार्क या कंपन्यांही क्रेडिट बाबत माहिती देतात.

सिबिल स्कोर का आवश्यक आहे ?

याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, तुम्ही खाली वाचू शकतात.

 • वेळेत भरा ईएमआय: कर्ज घेतले असल्यास त्याचे हसे (ईएमआय) नियमित भरा.
 • क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या: क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर सिबिल स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या व बिल वेळेवर अदा करा.
 • झेपेल तेवढेच कर्ज घ्या: आवाक्याबाहेर जास्तीचे कर्ज घेऊन हप्ते वाढवून घेऊ नका.
 • वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका: मोबाइल अॅपद्वारे आता सिबिल स्कोअर पाहता येतो. पण वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका. कारण त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.
 • सामाईक खात्यापासून राहा सावध: सामाईक खाते (जॉइंट अकाउंट) उघडण्याचे टाळा.

कारण तुमच्या सहकाऱ्याने कर्ज घेऊन थकविल्यास तुमचा सिबिल स्कोअरही बाधित होऊ शकतो. याशिवाय कर्जाला जामीन राहताना काळजी घ्या. कारण थकीत कर्जाच्या जामीनदाराचा सिबिलही खराब होतो.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment