Chandan Kanya Yojana Maharashtra | चंदन कन्या योजना | Chandan Kanya Scheme | Chandan Kanya Yojana From | चंदन कन्या योजना कागदपत्रे

By Bajrang Patil

Published on:

Chandan Kanya Yojana Maharashtra :– नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. चंदन कन्या योजना राज्यामध्ये राबवण्यात सुरू झालेले आहे.

खास करून शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. शेतकऱ्यांच्या मुलीसाठी योजना नेमकी काय चंदन कन्या योजना या योजनेला हे नाव का देण्यात आले. चंदन कन्या योजना चा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ नेमकं काय आहेत. आणि त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज कसे करायचे ते संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. यासाठी हा लेख संपूर्ण वाचा त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल. 

Chandan Kanya Yojana Maharashtra

चंदन कन्या योजना फायदे :– मुलीच्या नावे लागवडीसाठी 100 चंदन झाडे तालुकास्तरावर रुपये आपल्याला मिळतात. तर चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन सुद्धा दिले जाते.

लागवडीनंतर एक वर्षाने चंदन झाडाची नोंद सातबारावर घेण्यासाठी मोफत मदत दिली जाणार आहे. आणि चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याच्या तोडणी वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत ही देखील दिली जाणार आहे.

त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागाच्या बांधावर व शेतात लागवडीसाठी. असलेल्या अनुदान योजनेचा फायदा घेण्यासाठी माहिती व मार्गदर्शन सुद्धा मिळेल.

चंदन कन्या योजना फायदे

तसेच चंदन झाडाची महाराष्ट्र  ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजार भाव विक्री करण्यासाठी मदत देखील आपल्याला मिळणार आहे. किमान वीस शेतकरी नोंद असलेल्या तालुका स्तरावर आपले रोपे मिळणार आहे.

अर्थातच 20 शेतकऱ्यांची नोंद झाल्यानंतर तालुका स्तरावर  रोपे दिले जातील. फक्त वीस झाडे जर व्यवस्थित सांभाळत आली तर आपल्याला चंदन पासून पंधरा ते वीस लाख रुपये देखील या ठिकाणी मिळू शकतात. या योजनेचे असे फायदे आहेत आपण नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता.

📑 हे पण वाचा :- आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस

चंदन कन्या योजना कागदपत्रे

चंदन कन्या योजना फायदे घेण्यासाठी किंवा योजनेत सहभाग घेण्यासाठी आपल्याला हे आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे. असे मुलींचे आधार कार्ड, आणि त्याचबरोबर जन्मदाखला असल्याचा झेरॉक्स कॉपी,

वडिलांच्या आधार कार्ड चंदन कन्या योजना नोंदणी शुल्क 6500 रुपये लागणार आहे. तर चंदन कन्या योजना फॉर्म साठी तुमचे नाव त्याच्या नंतर तुमच्या मुलीचे आपण या ठिकाणी चंदन योजनेचा लाभ घेऊ शकतो.

चंदन तोडणे कायदेशीर आहे का ? 

चंदन लागवड करणे व तोडीने करणे हे कायदेशीर आहेत का ?, तर चंदन तोडणी ही कायदेशीर आहेत. चंदन लागवड केल्यास आपल्या शेतजमिनी सातबारा इतर मालमत्ता आपण लावलेल्या चंदन झाडाची नोंद करणे आवश्यक आहे.

नोंदीच्या आधारे चंदन झाडे तोडण्यास योग्य झाल्यास वन विभागाकडून तर रीतसर अर्ज करून तोडणी आपण करू शकता. तर अशाप्रकारे चंदन कन्या योजना महाराष्ट्र होती.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment