Biyane Anudan Yojana Maharashtra | Mahadbt बियाणे खते औषध 50% अनुदान योजना

By Bajrang Patil

Updated on:

Biyane Anudan Yojana Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधव व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तसेच शेतकरी बांधव आपल्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधेसाठी खरेदी करू लागला आहे.

यातच शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाच्या अंतर्गत 50 टक्के अनुदान. बी-बियाणे अनुदान योजना त्याचबरोबर खत औषधे अनुदान योजना

खरीप हंगामासाठी ऑनलाइन पद्धतीने 50 टक्के अनुदानावर बियाणे खते औषधे अनुदान योजना सुरु झाली. ही महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर अर्ज सुरु झालेल्या आहेत.

Biyane Anudan Yojana Maharashtra

हेच अर्ज 50 टक्के अनुदानावर कसे करायचे आहेत. यासाठी कागदपत्रे, पात्रता, अनुदान याविषयी सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या बियाणे करिता अनुदान आहे, खतासाठी अनुदान आहे ही संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत, लेख संपूर्ण वाचा.


शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Biyane Anudan Yojana

सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात,

गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१४-१५ पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सन २०१८-१९ व २०१९-२० ही वर्षे केंद्र शासनाने पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) वर्षे म्हणून जाहीर केली आहेत. त्यास अनुसरून सन २०१८-१९ पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अंतर्गत मका पिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्ये

(न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरु केली आहेत. या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतव्यय निर्धारित केला आहे.

बी-बियाणे अनुदान योजना

महाडीबीटी फार्मर पोर्टल वर बियाणे अनुदान योजना. तसेच बियाणे खते याकरिता नेमकी कोणत्या बियाण्यासाठी किती अनुदान आहे. म्हणजेच कोणत्या खते बियाणे साठी किती अनुदान दिले जाणार आहे.

त्या संदर्भातील पीडीएफ फाईल हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल. म्हणजे कोणते बियाणे खतेसाठी किती अनुदान मिळणार आहे. हे जाणून घेण्यासाठी खाली दिली पीडीएफ फाईल नक्की पहा.

येथे पहा बियाणे अनुदान pdf  फाईल लगेच

बियाणे कोणत्या कोणते मिळणार अनुदानावर 

 • केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे,
 • 1. राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
 • 2. राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
 • 3. राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
 • राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
 • राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
 • अ) ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर,
 • उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
 • ब) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
 • क) रागी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
 • ड) कापूस: (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ.
 • (नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
 • इ) ऊस: (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
 • (लातूर विभाग) – लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

बियाणे अनुदान योजना पात्रता

जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी,कापूस,ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल. तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील.

2) कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय आहे.3) शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जर लाभार्थ्याला गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा. असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य पिके असणे आवश्यक आहे. आणि जर लाभार्थ्याला वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावयाचा.

असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे. 5) शेतक-याचे स्वतःचे नावे ७/१२ व ८/अ उतारा असणे बंधनकारक राहील.

बियाणे अनुदान योजना कागदपत्रे

 • ७/१२ प्रमाणपत्र
 •  ८-ए प्रमाणपत्र
 •  खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
 •  केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
 •  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
 •  हमीपत्र
 •  पूर्वसंमती पत्र

हेही वाचा; शेळी पालन शेड 100% अनुदान योजना 2022 सुरु 

बियाणे अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा करावा 

महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना अर्थातच महाडीबीटी पोर्टल यावरती शेतकऱ्यांसाठी विविध योजना. या एकाच पोर्टल वरती राबवले जातात. आणि यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे खरीप हंगाम असो

किंवा रब्बी हंगाम असेल यासाठी शासनाने बी-बियाणे खत औषधे या करिता अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बियाणे अनुदान योजना

तसेच खते अनुदान योजना याकरिता 50 टक्के अनुदान दिले जाते. तर यामध्ये प्रात्यक्षिक बियाणे करिता शंभर टक्के अनुदान देण्यात येते.

बियाणे खते अनुदान

आता बियाणे खते अनुदान 5% अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. त्यासाठी कागदपत्रे पात्रता कोणती आहे. ऑनलाइन फॉर्म कसा भरावा महाडीबीटी बियाणे खते अनुदान योजना बियाणे अनुदानावर कसे घ्यावे.

बियाणे अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा. या संदर्भात आपले सर्व प्रश्न आहेत हे प्रश्नांची उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment