Ayushman Bharat Card नमस्कार मित्रांनो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये केली. या योजनेंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळवण्यासाठी एक महत्वाची पायरी म्हणून ही योजना राबवली जात आहे.
सध्या या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि नुकतीच याचा विस्तार करण्यात आलेला आहे. नवीन बदलानुसार, ७० वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
आयुष्मान भारत योजनेसाठी लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. योजनेअंतर्गत २९ हजारांहून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध आहे.
Ayushman Bharat Card 2024
३० जून २०२४ पर्यंत या योजनेचा लाभ ३४.७ कोटी लोकांनी घेतला आहे. ताज्या कॅबिनेट बैठकीत ७० वर्षांवरील वृद्धांना योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
📢 हे पण वाचा :- Driving License साठी RTO मध्ये टेस्ट देण्याची गरज नाही, सरकारने नियमात केला बदल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता
आयुष्मान भारत योजनेसाठी कच्च्या घरात राहणारे, भूमिहीन, ग्रामीण भागातील, तृतीयपंथी, दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात. असंघटित क्षेत्रात काम करणारे मजुरी करणारे व्यक्तीही योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया
- कुटुंबाचे कार्ड काढण्यासाठी सर्व सदस्यांची माहिती असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, इत्यादी घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UTI-ITSL केंद्रावर जा.
- पात्रता तपासून मिळाल्यावर आयुष्मान कार्ड बनवून मिळेल.
📢 हे पण वाचा :- पीएम घरकुल घरकुल योजनेत मोठा बदल आता या नागरिकांना मिळणार हक्काचे घर पहा नवीन निर्णय !
ऑनलाइन आयुष्मान कार्ड काढण्यासाठी
1) आयुष्मान ॲप डाउनलोड करा.
2) गुगल प्ले स्टोअरवरून किंवा सरकारी वेबसाइटवरून अर्ज करा.
3) मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
4) पात्रता तपासा.
5) पात्र असाल तर आधार ई-केवायसी करा.
6) फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा.
योजनेअंतर्गत उपचार
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू यासारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार दिले जातात.
कुटुंबातील सदस्यांची संख्या
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एका कुटुंबातील कितीही सदस्यांचे कार्ड काढता येतात. पात्र असलेले कोणतेही सदस्य कार्डसाठी अर्ज करू शकतात.