Amrut Pattern Cotton Farming | अमृत पॅटर्न कापूस लागवड एकरी 50 क्विंटल उत्पादन पहा संपूर्ण माहिती

By Bajrang Patil

Published on:

Amrut Pattern Cotton Farming :- शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच असेल की कापसाच्या शेतीसाठी साधारणपणे 30 हजार रुपये खर्च येतो. पण तो उत्पन्न देखील जवळपास तेवढेच मिळते तर शेतकऱ्यांचा त्यामध्ये अधिक तोटा होतो.

त्यामुळे शेतकरी कापसाच्या शेतीकडून पाठ फिरवत आहेत. तर अशातच एक अतिशय महत्त्वाचं पॅटर्न राबवण्यात येत आहे. आणि तो पॅटर्न म्हणजेच अमृत पॅटर्न या अमृत पॅटर्न ने लागवड केल्यास त्यापासून शेतकरी बांधव दोन लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न घेऊ शकतो.

अर्थातच जवळपास 1 एकरामध्ये 50 क्विंटल विक्रमी कापूस या अमृत पॅटर्न कडून घेण्यात आले आहे. हे नेमकं अमृत पॅटर्न काय आहे ?, त्याचा लाभ शेतकरी बांधव कसे घेऊ शकतात. आणि याची लागवड करून याचा नियोजन कसं करायचं. 

 
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Amrut Pattern Cotton Farming

अमृत देशमुख मु.पो.आंबोडा महागाव जिल्हा यवतामळ असे अमृत पॅटर्न विकसीत करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. देशमुख यांच्याकडे १२ एकर शेती आहे. यात ते कापूस, सोयाबीन, तूर, भूईमूग, ऊस आदी पिकांची लागवड करतात.

गेल्या पाच वर्षांपासून कापसासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. मागील वर्षी त्यांनी ४ एकरवर ७१५१ व राशी ६५९ या प्रजातीच्या कापसाची लागवड केली. पंरतु, ती पांरपारिक पध्दतीने न करता स्वत:च लागवड पध्दत विकसीत केली.

अमृत पॅटर्न कापूस लागवड

त्या पध्दतीला अमृत पॅटर्न असे नाव दिले. कापसाची लागवड करताना त्यांनी पट्टा पद्धतीने उत्तर दक्षिण अशा स्वरूपात केली. रासायनिक आणि शेण खताचा वापर केला. एकाचवेळी खताची मात्रा न देता दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरावर दिले. 

उत्तर-दक्षिण पद्धतीने झाडांची लागवड केल्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळून झाडांची चांगली वाढ झाली.  झाडांना भरपूर फांद्या फुटल्याने बोडांची संख्या वाढली. कापसाच्या झाडांना बांबू आणि ताराचा आधार देण्याचा प्रयोग प्रथमच केला. एक एकर लागवडीचा खर्च ५० हजार रुपये आला. 

Amrut Pattern Cotton Farming

हेही वाचा; कापूस बोंड अळी नियंत्रण पहा माहिती 100% होणार फायदा 

कापूस लागवड अमृत पॅटर्न उत्पादन

अमृत पॅटर्नमुळे त्यांनी एकरी ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले. सर्व खर्च जाता एकरी दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. देशमुख यांच्या प्रयोगाची कृषी विद्यापीठाने घेतली.

त्यांना विद्यापीठात बोलावून एकरी ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन घेण्याचे तंत्र, पट्टा पध्दती आणि अमृत पॅटर्न समजून घेतला. कापूस उत्पादकांनी या पध्दतीचा अवलंब करुन चारपैस अधिकचे मिळविणे शक्‍य असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

Amrut Pattern Cotton Farming

हेही वाचा; कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment