Ajanta Leni Mahiti Marathi | अजिंठा लेणी फोटो | अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला ? | अजिंठा लेणीची माहिती मराठीत | अजिंठा लेणीची माहिती !

By Bajrang Patil

Updated on:

Ajanta Leni Mahiti Marathi :- नमस्कार सर्व पर्यटकांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. या लेखात अजिंठा लेणी याविषयी सविस्तर माहिती लेखात पाहणार आहे.

जसे अजिंठा लेणी चा शोध केव्हा लागला त्याचबरोबर अजिंठा लेणी चा इतिहास काय आहे. तसेच अजिंठा लेणी पाहण्यासाठी योग्य वेळ कोणता आहे. म्हणजेच योग्य वातावरण

तसेच अजिंठा लेणी ही कधी सुरू असते. तसेच अजिंठा लेणी  किती वेळ सुरु असते. तसेच अजिंठा लेणी च्या एकूण 29 लेण्या विषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

Ajanta Leni Mahiti Marathi

अजिंठा लेणी ची माहिती :- अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात येते. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये येते. आणि अजिंठा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरातन काळात कोरलेली

अजिंठा लेणी 29 लेण्या. यामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी केवळ 26 लेण्या या सुरू करण्यात आलेल्या आहे. आणि उर्वरित चार लेण्या आहेत या लेण्यांचे काम पूर्ण झाले नसल्याकारणाने पर्यटकांसाठी सुरू केलेल्या नाही.

अजिंठा लेण्या ही पूर्व दुसरे शतक ते इसवीसनपूर्व चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्माण झालेल्या. एकूण 29 लेण्या ह्या कोरण्यात आल्या होत्या. अजिंठा लेणी ही औरंगाबाद पासून शंभर किलोमीटर आहे.

अजिंठा लेणी चा शोध

तसेच जळगाव शहरापासून ५२ किलोमीटर वर अजिंठा लेणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच अजिंठा लेणी गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित जीवन जीवनातील संपूर्ण माहिती चित्रकला.

तसेच अजिंठा लेणीतील सर्वाधिक प्रिय लेणी मध्येच लेणी क्र.01, लेणी क्र.02, लेणी क्र.10, लेणी क्र.16, लेणी क्र.17  या लेण्यांमध्ये अतिशय सुंदर आपल्याला पेंटिंग पाहायला मिळते.

अजिंठा लेणी चा शोध कोणी लावला

या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ. हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर

आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत.

हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर

(इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

रॉबर्ट गिल कोण आहेत व त्यांची संपूर्ण माहिती 

रॉबर्ट गिल (२६ सप्टेंबर, इ.स. १८०४ – १० एप्रिल, इ.स. १८७५) हा ब्रिटिश भारतातील एक सैन्याधिकारी, चित्रकार तसेच छायाचित्रकार होता. अजिंठा येथील चित्रशिल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी

इंग्रजांनी इ.स. १८४४ मध्ये त्यांच्या सैन्यातील चित्रकार रॉबर्ट गिल याची नेमणूक केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’त चित्रकला शिकलेला मेजर गिल हा अजिंठय़ाच्या पायथ्याशी

असलेल्या लेणापूर गावी दाखल झाल्यानंतर त्याची भेट पारो या स्थानिक तरुणीशी झाली. लेण्यांचे आणि या चित्रांचे महत्त्व जाणणाऱ्या पारोने त्याला नैसर्गिक रंगसाहित्य पुरवण्यापासून सर्वतोपरी सहाय्य केले. 

अजिंठा लेणी कधी बंद असते

पर्यटकांना अजिंठा लेणी ही पाहण्यासाठी मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी खुले असते लेणी बंद राहण्याचा दिवस म्हणजेच सोमवार कोणत्याही पर्यटकांना लेणी उघडी नसते अजिंठा लेणी

पाहण्यासाठी खुली केव्हा असते म्हणजे लेणी सुरू करण्याचा आणि बंद करण्याचा वेळ हा मंगळवार ते रविवार सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत लेण्यात

पर्यटकांसाठी खुले असतात परंतु लेणी मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पाच वाजे पर्यंत लेणी मध्ये जाणे आवश्यक असते पाचच्या नंतर लेणी मध्ये प्रवेश दिला जात नाही

अजिंठा लेणी विषयी माहिती मराठी

अजिंठा लेणी पाहण्यासाठी योग्य वातावरण म्हणजेच आपण पावसाळा सुरू असताना सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये पाहू शकता. अजिंठा लेणीचा चांगला दृश्य आपल्याला पहायला मिळते. वातावरणही खूप सुंदर असते.

कारण अजिंठा लेणी एक घनदाट जंगलांमध्ये असून पावसाळ्यातील पाण्याचे धबधबे किंवा अतिशय सुंदर डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अजिंठा लेणी पाहू शकता.

Ajintha Leni Photo/अजिंठा लेणीचे फोटो 

Ajintha Leni Mahiti Marathi

📢 शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे पहा 

📢 चंदन लागवड योजना :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment